पर्यटकांच्या मांदियाळीत सुविधांची वानवा

By Admin | Updated: February 13, 2015 22:54 IST2015-02-13T22:50:40+5:302015-02-13T22:54:06+5:30

शाहू मैदान परिसर गर्दीने फुललेला : बिंदू चौकातील पार्किंग व्यवस्था प्राथमिक अवस्थेतच

Tourists' convenience stores | पर्यटकांच्या मांदियाळीत सुविधांची वानवा

पर्यटकांच्या मांदियाळीत सुविधांची वानवा

कोल्हापूर : शहरातील बहुतांश ऐतिहासिक स्थळे असलेल्या शाहू मैदान (प्रभाग क्रमांक ५२) परिसरात दररोज हजारोंच्या संख्येने पर्यटकांची गर्दी असते. प्रभागात सोयी-सुविधांची रेलचेल आहे. मात्र, अंबाबाईसह पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांना मात्र असुविधांचा सामना करावा लागत आहे. महापालिकेतील एक वजनदार नगरसेवक या नात्याने स्थायी समिती सभापती आदिल फरास यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.बिंदू चौक, कारागृह, भवानी मंडप, मेन राजाराम हायस्कूल, शाहू खासबाग कुस्त्यांचे मैदान, केशवराव भोसले नाट्यगृह, शाहू मैदान, साठमारी, दूधकट्टा, राजारामियन्स क्लब, देवल क्लब, मिरजकर तिकटी, शिवाजी स्टेडियमसह बालगोपाल तालीम, पाटाकडील तालीम मंडळ, बाराइमाम तालीम मंडळ, आदी पर्यटकांसह शहरवासीयांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेली स्थळे शाहू मैदान प्रभाग परिसरात येतात. ‘सतत गर्दीने फुललेला परिसर’ अशीच या भागाची ओळख आहे. अंबाबाईच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या संख्येनेभाविक येत असतात. या सर्वांचा भार येथील व्यवस्थेवर पडत आहे. प्रभागात प्रायव्हेट हायस्कूल, इंदुमती हायस्कूल, नूतन मराठा हायस्कूल, कॉमर्स कॉलेज, आदींमुळे विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. अपुरी पार्किंग व्यवस्था, सतत वाहनांच्या गर्दीने गजबजलेले रस्ते यांमुळे नागरिकांसह पर्यटकांना त्रास सहन करावा लागतो. बिंदू चौकातील पार्किंग व्यवस्था प्राथमिक अवस्थेतच आहे. शौचालय अथवा स्वच्छतागृहांची सोय नाही. पावसाळ्यात पार्किंगस्थळ म्हणजे चिखलगुठ्ठाच असतो. कोल्हापूरचे विदारक दृश्य पर्यटकांच्या समोर येत असल्याने कोल्हापूूरबद्दल हीच प्रतिमा घेऊन पर्यटक माघारी फिरतात. याकडे आदिल फरास यांनी लक्ष देण्याची तीव्र मागणी पर्यटकांसह नागरिकांची आहे.मागील निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे प्रभागातील सर्व समस्यांचे निराकरण केल्याचा दावा आदिल फरास यांनी केला आहे. शहरातील सर्वांत उंच भाग असल्याने या परिसरात पाण्याचे नियोजन कोलमडले होते. कळंबा व चंबुखडी येथून परिसरात पाणीपुरवठा होतो. प्रभागातील अनेक पाईपलाईन्स बदलून पाण्याचे योग्य नियोजन केल्याचे आदिल फरास यांनी सांगितले. पार्किंग, वाहतुकीला शिस्त, गोंगाट, अतिक्रमण आदींवर फरास यांनी लक्ष देण्याची प्रभागातील नागरिकांची मागणी आहे.


प्रभागातील सर्व विकासकामे पूर्ण केली आहेत. १०० टक्के रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. केशवराव भोसले नाट्यगृह व खासबाग मैदान सुशोभिकरणाचे काम दर्जेदार होण्यासाठी लक्ष ठेवून आहे. प्रभागात सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी नवीन पाच लाईन्स टाकल्या आहेत. पर्यटकांना सुविधा व वाहतूक समस्येवर उपाय शोधण्यावर आगामी काळात भर राहील.
- आदिल फरास ( स्थायी समिती सभापती)

Web Title: Tourists' convenience stores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.