फेसबुक मैत्री करत तरुणीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:25 IST2021-01-21T04:25:03+5:302021-01-21T04:25:03+5:30

इस्लामपूर : फेसबुकवरून झालेल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत वाळवा तालुक्यातील एका गावातील २२ वर्षीय तरुणीवर तिच्या ...

Torture a young woman making Facebook friends | फेसबुक मैत्री करत तरुणीवर अत्याचार

फेसबुक मैत्री करत तरुणीवर अत्याचार

इस्लामपूर : फेसबुकवरून झालेल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत वाळवा तालुक्यातील एका गावातील २२ वर्षीय तरुणीवर तिच्या मित्राने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार जून २०२०पासून सुरू होता. दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या तरुणीने पोलिसात धाव घेतली आहे.

याप्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अजय संभाजी वड्ड (वय २१, रा. भादोले, जि. कोल्हापूर) याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. यातील पीडित तरुणी मूळची मुंबईची आहे. ती आईसह शिक्षण व कामानिमित्त आजोळी राहते. ही तरुणी मुंबई येथे असताना जून २०२०मध्ये फेसबुकवरून तिची संशयित अजय वड्ड याच्याशी ओळख झाली. त्यानंतर दोघांचे संभाषण होऊ लागले. यातून मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. वड्ड याने तरुणीला दुचाकीवरून नेत जोतिबाचे देवदर्शन करून पुन्हा आणून सोडले. त्यानंतर कोल्हापूरच्या रंकाळ्यावर फिरायला घेऊन जात असताना ते आष्टा येथे थांबले. त्याचठिकाणी चहापान झाल्यावर गप्पा मारण्याचे निमित्त करत त्याने पीडितेला लॉजवर नेले. ‘तुझ्याशी लग्न करणार आहे, त्यामुळे आपण संबंध ठेवले तर काय फरक पडणार आहे’, असे म्हणत तो लगट करू लागला. मात्र, तरुणीने नकार दिल्यावर त्याने अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा लग्नाचे आमिष दाखवत आष्टा येथील लॉजवर अत्याचार केला. मात्र, लग्नाचा तगादा लावताच त्याच्याकडून टाळाटाळ होऊ लागल्याने पीडितेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर तिने पोलिसात याविषयीची फिर्याद दिली.

Web Title: Torture a young woman making Facebook friends