कासेगावमध्ये शौचालय अखेर वापरासाठी खुले
By Admin | Updated: July 12, 2014 00:19 IST2014-07-12T00:15:46+5:302014-07-12T00:19:26+5:30
प्रशासनाला जाग : ग्रामस्थांमधून समाधानाचे वातावरण

कासेगावमध्ये शौचालय अखेर वापरासाठी खुले
लोकमतचा दणका
कासेगाव : ‘लोकमत’च्या दणक्यानंतर कासेगाव (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागे झाले आणि सार्वजनिक शौचालयाचे कुलूपबंद युनिट ग्रामस्थांना वापरण्यासाठी खुले केले गेले.
बाजारपेठेलगत व मातंग समाजासाठी शौचालय युनिट बांधून बरीच वर्षे झाली. परंतु ते वापरासाठी खुले न करता कुलूपबंद ठेवण्यातच ग्रामपंचायत प्रशासनाने धन्यता मानली होती. ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार मागणी करुनही ही शौचालये वापरासाठी खुली केली नव्हती. या प्रश्नावर ‘लोकमत’ने आवाज उठवताच झोपेचे सोंग घेतलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाला जाग आली. त्वरित कार्यवाही करुन ही शौचालये ग्रामस्थांना वापरण्यासाठी खुली करण्यात आली. यामुळे ‘लोकमत’चे अभिनंदन होत आहे. दरम्यान, बाजारपेठेलगत असलेल्या शौचालयाची दुरुस्ती करुन व पाण्याची सोय करुन येथील शौचालय युनिटही लवकरच सुरु केले जाईल, अशी माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने दिली. (वार्ताहर)