पतंगराव कदम यांचा आज स्मृतिदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:28 IST2021-03-09T04:28:55+5:302021-03-09T04:28:55+5:30

: काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांचा मंगळवारी तृतीय स्मृतिदिन आहे. या पार्श्वभूमीवर ...

Today is the memorial day of Patangrao Kadam | पतंगराव कदम यांचा आज स्मृतिदिन

पतंगराव कदम यांचा आज स्मृतिदिन

: काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांचा मंगळवारी तृतीय स्मृतिदिन आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय नेतेमंडळी, कार्यकर्ते आणि साहेबप्रेमी नागरिक सोनहीरा साखर कारखाना परिसरातील स्मृतिस्थळी दर्शनासाठी येणार आहेत.

सोनहीरा कारखाना परिसरातील स्मृतिस्थळावर मंगळवारी सकाळी ८.३० वाजता आमदार मोहनराव कदम व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्यासह कदम कुटुंबीय अभिवादनासाठी

उपस्थित राहणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कीर्तन कार्यक्रम होणार नाही. मास्क वापरणे आणि सोशल

डिस्टन्सिंग ठेवणे बंधनकारक असणार आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी गर्दी न करता प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असे आवाहन डॉ. पतंगराव कदम सोनहीरा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद कदम यांनी केले आहे.

Web Title: Today is the memorial day of Patangrao Kadam