शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

अर्ज भरण्यासाठी आज उडणार झुंबड

By admin | Updated: October 28, 2016 23:50 IST

नगरपालिका, नगरपंचायत निवडणूक : जिल्ह्यात ६०६ उमेदवारांचे अर्ज दाखल; आज अंतिम मुदत; आॅफलाईन अर्ज स्वीकारणार

सांगली : जिल्ह्यात होत असलेल्या पाच नगरपालिका आणि चार नगरपंचायतींच्या निवडणुकीची चुरस वाढत असून, शुक्रवारी अनेकांनी धनत्रयोदशीचा मुहूर्त साधला. जिल्ह्यात दिवसभरात ३७९ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, शुक्रवारअखेर ६०६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज, शनिवार शेवटचा दिवस आहे. त्यातच आॅफलाईन अर्ज भरण्याची सवलत मिळाल्याने आज एकच गर्दी उसळणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील प्रमुख शहरांत निवडणुकीचे वातावरण असल्याने राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. जिल्ह्यात आष्टा, इस्लामपूर, तासगाव, विटा आणि पलूस या नगरपालिका, तर कडेगाव, कवठेमहांकाळ, खानापूर, शिराळा येथील नगरपंचायतींसाठी २७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आज, शनिवार अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. दिवाळीत धनत्रयोदशीला महत्त्व असल्याने शुक्रवारी अनेक उमेदवारांनी हाच मुहूर्त साधला. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी अर्ज दाखल करताना चुरस दिसून आली. विटा येथे दिवसभरात ५४ अर्ज, तर तासगाव येथे ६० अर्ज दाखल झाले. या निवडणुकीसाठी आॅनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत असल्याने, प्रशासनावरील ताण बऱ्यापैकी कमी झाला असला तरी, उमेदवार आणि पक्षीय नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. आॅनलाईनच्या फटक्यामुळे खानापूर येथे केवळ पाच उमेदवारी अर्ज शुक्रवारअखेर दाखल झाले आहेत. नगराध्यक्षपदासाठी थेट जनतेतून मतदान होणार असल्याने नगरपरिषद निवडणुकीतील चुरस वाढली आहे. आॅनलाईन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया क्लिष्ट असून, या प्रक्रियेबाबत संभ्रम दिसत होता. परंतु निवडणूक आयोगाने उमेदवारांची अडचण लक्षात घेऊन शुक्रवारी आॅफलाईन अर्ज दाखल करण्यास परवानगी दिली. शिवाय शनिवारी अंतिम मुदत असल्याने गर्दी उसळणार आहे. (प्रतिनिधी) शिराळ््यात बहिष्कार कायम ४पारंपरिक पद्धतीने नागपंचमी सण साजरा करण्यास परवानगी मिळावी, या मागणीसाठी शिराळकर नागरिकांनी नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. ४उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघा एक दिवस उरला असताना एकही अर्ज दाखल झाला नसल्याने नागरिकांचा बहिष्कार कायम राहण्याची शक्यता आहे. आज सुटी तरीही... ४आज, शनिवारी नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी आज स्थानिक सुटी जाहीर केली आहे. ४या सुटीदिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याविषयी शंका असतानाच, सुटी असली तरीही आज, शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.