अरुणभय्या नायकवडी यांचा वाळव्यात आज स्मृतिदिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:28 IST2021-02-24T04:28:23+5:302021-02-24T04:28:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाळवा : वाळवा येथे आज, बुधवारी रोजी अरुणभय्या नायकवडी यांच्या १६ व्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात ...

अरुणभय्या नायकवडी यांचा वाळव्यात आज स्मृतिदिन
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळवा : वाळवा येथे आज, बुधवारी रोजी अरुणभय्या नायकवडी यांच्या १६ व्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले आहे.
सकाळी ९.३० वाजता मान्यवरांच्या हस्ते अरुणभय्या नायकवडी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पांजली अर्पण करण्यात येईल. त्यानंतर अरुणभय्या नायकवडी स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार सांगलीच्या संपदा ग्रामीण महिला संस्थेच्या (संग्राम) अध्यक्षा मीना सरस्वती शेषू यांना प्रदान केला जाईल.
तसेच दापोली कृषी विद्यापीठात एम.एस्सी.ॲग्रीला प्रथम आलेली विद्यार्थिनी श्वेता मयेकर हिचाही पारिताेषिक देऊन सन्मान केला जाईल. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी भूषविणार आहेत. संयोजन हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाच्या वतीने करण्यात येत आहे. साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून हुतात्मा विद्यालयाच्या मैदानावर हा कार्यक्रम हाेणार आहे.