शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ, अपुरा पुरवठा, नागरिकांतून संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 15:48 IST

कृष्णा नदी उशाला असतानाही सांगली शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेदिवस गंभीर बनत चालला आहे. गावभागापाठोपाठ शहरातील शामरावनगरमधील पाच ते सहा कॉलनीत महिनाभरापासून अपुरा पाणीपुरवठा होत आहे. बुधवारी नागरिकांनी दूरध्वनीवरून पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी जाब विचारल्या. अखेर महापालिकेला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली.

ठळक मुद्देसांगलीत टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळउपनगरात महिनाभरापासून अपुरा पुरवठा : नागरिकांतून संताप

सांगली : कृष्णा नदी उशाला असतानाही सांगली शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेदिवस गंभीर बनत चालला आहे. गावभागापाठोपाठ शहरातील शामरावनगरमधील पाच ते सहा कॉलनीत महिनाभरापासून अपुरा पाणीपुरवठा होत आहे. बुधवारी नागरिकांनी दूरध्वनीवरून पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी जाब विचारल्या. अखेर महापालिकेला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली.शामरावनगर परिसरातील सुंदर कॉलनी, समता कॉलनी, जनता बँक कॉलनी, मदरसा परिसर, विठ्ठल कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनीसह विविध गल्ल्यात अपुरा पाणीपुरवठा होत आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने नागरिकांनी महिनाभर अपुऱ्या पाण्यावर तहान भागविली. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडेही तक्रारी करण्यात आल्या. पण या विभागानेही दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला.

सामाजिक कार्यकर्ते संदीप दळवी यांच्यामार्फत नागरिकांनी अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून जाब विचारला. त्यानंतर महापालिकेने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. दुपारपर्यंत दोन टँकर पाठविण्यात आले. कोरोनामुळे गर्दी करण्यास बंदी आहे. टँकर आल्यानंतर नागरिकांनी पाण्यासाठी गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागली. प्रत्येक घरासमोर टँकर उभा करून पाणी देण्यात येत होते.या परिसराला पाणीपुरवठा सुरळीत व्हावे, यासाठी कोल्हापूर रस्त्यावरील आकाशवाणीजवळ नवीन पाणी टाकी उभारण्यात आली. या टाकीतून पाणीपुरवठाही सुरू झाला. पण शामरावनगरचा पाणीप्रश्न काही सुटलेला नाही. महापालिकेकडून या टाकीतून चोवीस तास पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. पण अजूनही शामरावनगरमधील अंतर्गत गल्लीमध्ये अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातSangliसांगलीMuncipal Corporationनगर पालिका