शेतीचे ११५ कोटींचे वीज बिल थकित

By Admin | Updated: November 14, 2014 23:24 IST2014-11-14T23:10:11+5:302014-11-14T23:24:48+5:30

महावितरणला फटका : ‘कृषी संजीवनी’कडे दुर्लक्ष

Till the electricity bill of 115 crores of agriculture | शेतीचे ११५ कोटींचे वीज बिल थकित

शेतीचे ११५ कोटींचे वीज बिल थकित

सांगली : जिल्ह्यातील एक लाख ४६ हजार ७५४ कृषी पंपांच्या ग्राहकांकडे महावितरण कंपनीची ५ नोव्हेंबर २०१४ पर्यंतची ११५ कोटी रूपयांची वीज बिलाची थकबाकी आहे. ही थकबाकी वसुलीसाठी महावितरण कंपनीने कृषी संजीवनी योजना आणूनही ग्राहकांनी त्याला काहीच प्रतिसाद न दिल्यामुळे थकबाकी काहीच वसूल झाली नाही. यामुळे महावितरण कंपनीकडील थकबाकीचा डोंगर वाढतच चालला आहे.
कृषी पंपांच्या थकबाकी वसुलीसाठी राज्य शासनाच्या सहकार्याने महावितरण कंपनीने आॅगस्ट २०१४ मध्ये कृषी संजीवनी योजना सुरु केली. या योजनेत सहभागी होणाऱ्या कृषिपंपधारक शेतकऱ्यांच्या थकित वीज बिलापैकी ५० टक्के शासन भरणार होते. उर्वरित ५० टक्के शेतकऱ्याने भरायची होती. या थकबाकीवरील व्याज आणि दंडाची रक्कम महावितरण कंपनी माफ करणार होती. या योजनेची पहिल्या टप्प्याची मुदतही संपली. परंतु, शेतकऱ्यांनी काहीच थकबाकी भरली नसल्यामुळे महावितरण कंपनीने पुन्हा एका महिन्याची मुदतवाढ देऊन ३० आॅक्टोबर २०१४ केली. या कालावधितही शेतकऱ्यांनी थकित वीज बिल न भरल्यामुळे महावितरण कंपनी आर्थिक अडचणीत सापडली आहे.
कृषी पंपांच्या वीज बिल थकितामध्ये कवठेमहांकाळ विभाग आघाडीवर आहे. या विभागामधील ५३ कोटी १७९ ग्राहकांचे चक्क ५३ कोटी ४६ लाख रूपये थकित वीज बिल आहे. थकबाकीत जत, कवठेमहांकाळ तालुके आघाडीवर असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. कवठेमहांकाळ विभागानंतर थकबाकीत दुसऱ्या क्रमांकावर सांगली ग्रामीण विभाग आहे. सांगली ग्रामीण विभागामध्ये मिरज, तासगाव तालुक्यांचा समावेश होतो. येथील ३३ हजार ११३ ग्राहकांकडे २६ कोटी ३१ लाख रूपये वीज बिलांची थकबाकी आहे. विटा विभागामधील ३७ हजार ३७४ ग्राहकांकडे २५ कोटी १५ लाख रूपयांची थकबाकी आहे.
सांगली शहर विभागात कृषी पंपाचे केवळ ९३६ ग्राहक असल्यामुळे त्यांच्याकडील थकबाकीही कमी दिसत आहे. इस्लामपूर विभागातील सात हजार २१५ ग्राहकांकडे नऊ कोटी ५६ लाख ४१ हजार रूपयांची थकबाकी आहे. या ग्राहकांकडील थकबाकीमुळे महावितरण कंपनी आर्थिक अडचणीत सापडली आहे. राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळेच ही शेती पंपाची थकबाकी असल्याचा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला आहे. (प्रतिनिधी)

कृषी पंपांची विभागनिहाय थकबाकी
विभागग्राहक संख्याथकबाकी
इस्लामपूर७२१५९.५६ कोटी
कवठेमहांकाळ५३१७९५३.४६ कोटी
सांगली ग्रामीण३३११३२६.३१ कोटी
सांगली शहर९३६५० लाख
विटा३७३७४२५.१५ कोटी
एकूण १४६७५४११४.९९ कोटी

Web Title: Till the electricity bill of 115 crores of agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.