चांदोली परिसरात वाघांची शिकार
By Admin | Updated: September 3, 2015 23:44 IST2015-09-03T23:44:24+5:302015-09-03T23:44:24+5:30
एकाच वाघाचे अस्तित्व : तस्करीमुळे निसर्गप्रेमींमध्ये उलटसुलट चर्चा

चांदोली परिसरात वाघांची शिकार
गंगाराम पाटील - वारणावती चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये केवळ एकाच वाघाचे अस्तित्व आढळत असल्याने अनेक वाघांची शिकार झाली असण्याची शक्यता असून, इस्लामपुरातील वाघांची कातडी व नख्यांच्या तस्करी प्रकरणामुळे निसर्गप्रेमींमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. वनक्षेत्रपाल व कर्मचाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे उद्यानामध्ये वन्यप्राण्यांची चोरटी शिकार होत आहे. वाघांची चोरटी शिकार रोखण्याचे मोठे आव्हान वन विभागासमोर आहे. जैवविविधतेने नटलेल्या पश्चिम घाटातील कोयना अभयारण्य व चांदोली राष्ट्रीय उद्यानातील वाघांच्या वाढीला पोषक वातावरण निर्माण होण्यासाठी केंद्राने या प्रकल्पाला ५ जानेवारी २०१० ला मान्यता दिली आहे. राज्यातला हा चौथा व्याघ्र प्रकल्प आहे. या व्याघ्र प्रकल्पासाठी कोयना अभयारण्याच्या ४२३.५५ व चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या ३१७.६७ चौरस किलोमीटर क्षेत्राचा समावेश केलेला आहे. सांगली जिल्ह्याच्या पश्चिम टोकावर चांदोली अभयारण्य आहे. या अभयारण्याचे क्षेत्र सांगली, सातारा, कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यांच्या सरहद्दीवर आहे. नैसर्गिक व निर्मनुष्य असणारे राज्यातले हे सर्वांत मोठे अभयारण्य आहे. हे अभयारण्य निर्मनुष्य होण्यासाठी चांदोली धरणामुळे अडचणीत आलेल्या सांगली जिल्ह्यातील १४ गावे व कोल्हापूर जिल्ह्यातील १४ गावांचे व रत्नागिरी जिल्ह्यातील एका गावाचे पुनर्वसन झाले. पुनर्वसन होऊन ती गावे त्या-त्या जिल्ह्यांच्या अन्य तालुक्यात गेली. जाताना त्यांनी घरेदारे मोडून मोडका-तोडका संसार गाड्या भरून नेला आणि चांदोलीचे अभयारण्य निर्मनुष्य झाले. प्राण्यांची संख्या वाढू लागली.
जैवविविधतेने नटलेल्या पश्चिम घाटातील कोयना अभयारण्य व चांदोली राष्ट्रीय उद्यानात वाघांचे अस्तित्व असल्याने केंद्राने या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला ५ जानेवारी २०१० ला मान्यता दिली आहे. गैरसमजुतीतून या प्रकल्पाविषयी लोकांत नाराजी दिसत असली तरी, वाघांच्या चोरट्या शिकारीमुळे वाघाची संख्या घटत आहे. वाघांचे व बिबट्यांचे अस्तित्व कमी होत असल्याचे आढळत आहे. त्यामुळे वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी नेमके करतात काय, असा सवाल निसर्गपे्रमींतून विचारला जात आहे.
इस्लामपुरातील वाघांच्या कातडीच्या तस्करी प्रकरणामुळे चांदोली राष्ट्रीय उद्यानातील चोरट्या शिकारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये केवळ एकाच वाघाचे अस्तित्व आढळत असल्याने चांदोली उद्यानामध्ये अनेक वाघांची शिकार झाली असण्याची शक्यता असून त्याची निसर्गप्रेमींमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.
बिबट्यांचे अस्तित्वही कमी झाले
गैरसमजुतीतून या प्रकल्पाविषयी लोकांत नाराजी दिसत असली तरी, वाघांच्या चोरट्या शिकारीमुळे वाघाची संख्या घटत आहे. वाघांचे व बिबट्यांचे अस्तित्व कमी होत असल्याचे आढळत आहे. त्यामुळे वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी नेमके करतात काय, असा सवल निसर्गपे्रमींतून विचारला जात आहे.