शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

प्राध्यापकांकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे तिने सीएच्या परीक्षेत मिळवलं घवघवीत यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2018 21:20 IST

मिरजेतील रेवणी गल्ली या परिसरात आठ-बाय आठच्या एका लहानशा पत्र्याच्या खोलीत राहणा-या रेखा संजय मगदूम हिने चार्टर्ड अकाऊंटंट परीक्षेत यश संपादन केले.

मिरज : मिरजेतील रेवणी गल्ली या परिसरात आठ-बाय आठच्या एका लहानशा पत्र्याच्या खोलीत राहणा-या रेखा संजय मगदूम हिने चार्टर्ड अकाऊंटंट परीक्षेत यश संपादन केले. परिस्थितीशी संघर्ष करून रेखाने मिळविलेल्या यशाबाबत तिचे कौतुक होत आहे.रेखा दीड वर्षाची असताना तिच्या वडिलांनी अचानक घर सोडले. तिची आई शकुंतला यांना तो मोठा धक्का होता.मात्र न डगमगता आलेल्या खडतर परिस्थितीचा सामना करत त्यांनी रेखाचे संगोपन करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी लोकांच्या घरोघरी जाऊन धुण्या-भांड्यांची कामे करीत रेखाला चांगल्या संस्कारांची शिदोरी देत वाढवले. सहावीपर्यंत शिक्षण झालेल्या शकुंतला यांनी अतिशय कमी उत्पन्न असतानाही लेकीच्या शिक्षणासाठी खर्च करण्यास मागेपुढे पाहिले नाही. रेखानेही परिस्थितीवर मात करत ज्युबिली कन्या शाळेत व डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयात शिक्षण घेऊन पदवी शिक्षण पूर्ण केले.रेखाचा महाविद्यालयीन शिक्षणाचा खर्च वाढत गेला; पण आईने तिच्या शिक्षणाला काही कमी पडू दिले नाही. रेखाची शिक्षणातील प्रगती पाहून मिरजेतील प्रा. संजय कुलकर्णी व प्रा. अभ्यंकर यांनी तिला चार्टर्ड अकाऊंटंटच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन केले. रेखाने चार्टर्ड अकाऊंटंटच्या परीक्षेत यश संपादन केले. गेल्या २५ वर्षांपासून धुणी-भांडी करणा-या आईला चांगले दिवस दाखविण्याचे तिचे स्वप्न आहे. रेखाला सनदी लेखापरीक्षक म्हणून चांगली नोकरी मिळण्याची प्रतीक्षा आहे. अत्यंत कठीण परिस्थितीवर मात करत रेखाने यश मिळविल्याने सांगलीतील मालू हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुचेता पाठारे यांनी रेखाला कपडे व आईला साडी भेट देऊन त्यांचे कौतुक केले. रेखाचे यश सर्वच विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे पाठारे यांनी सांगितले.प्रसंगी पोटाला चिमटारेखाची आई शकुंतला यांनी स्वत:च्या पोटाला चिमटा घेऊन रेखा हिला लॅपटॉप व दुचाकी अशा तिला आवश्यक असलेल्या गोष्टी घेऊन दिल्या. मोठ्या जिद्दीने त्यांनी घराचा गाडा हाकला. चार्टर्ड अकाऊंटंट म्हणजे काय हे त्यांना माहीत नाही. मात्र मोठी पुस्तके वाचून लेक मोठी परीक्षा पास झाल्याचे त्या सांगतात.

टॅग्स :Sangliसांगली