शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

खिसेकापू तीन महिलांना मिरजेत अटक, दोन लाखांचे दागिने जप्त

By घनशाम नवाथे | Updated: February 23, 2024 18:28 IST

तिघी रेकॉर्डवरील गुन्हेगार

सांगली : परजिल्ह्यातून सांगली, मिरजेत येऊन प्रवाशांचे दागिने, पर्स लांबवणाऱ्या विठाबाई नितीन चौगुले (वय ५०, आळते माळ, ता. हातकणंगले), नगीना सागर चौगुले (वय ४०, गोसावी गल्ली, हातकणंगले), सावित्री सैदू लोंढे (वय ५०, रा. कागवाड, ता. अथणी) या तिघींना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. तिघींकडून तीन गुन्हे उघडकीस आणत दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकाला बसस्थानकावर दागिने, पैसे चोरणाऱ्या टोळीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पथक चौकशी करत असताना मिरज बसस्थानकात चोरी केलेले दागिने विक्री करण्यासाठी तीन महिला छत्रपती शिवाजी क्रीडांगणाच्या प्रेक्षक गॅलरीत बसल्याची माहिती मिळाली.महिला पोलिसांना घेऊन पथकाने सापळा रचून तिघींना ताब्यात घेतले. महिला पोलिसांच्या मदतीने तिघींची झडती घेतली. तेव्हा रोख ५० हजार रुपये आणि दीड लाखाचे सोन्याचे दागिने असा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. चौकशीत विठाबाई हीने मिरज स्थानकावर गर्दीमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या बॅगमधील पर्स चोरी केल्या होत्या. त्यातील दागिने व रोकड असल्याचे सांगितले. तिघींनी महात्मा गांधी चौक पोलिस ठाणे हद्दीत तीन चोऱ्या केल्याची कबुली दिली. तिघींना गांधी चौक पोलिस ठाण्याकडे वर्ग केले आहे.

पोलिस कर्मचारी सपना गराडे, शुभांगी मुळीक, आमसिद्ध खोत, अमोल लोहार, अमोल ऐदाळे, राजू शिरोळकर, संकेत मगदूम, बाबासाहेब माने, सोमनाथ गुंडे, सोमनाथ पतंगे, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने कारवाई केली.

तिघी रेकॉर्डवरील गुन्हेगारअटक केलेल्या विठाबाई चौगुले, नगीणा चौगुले, सावित्री लोंढे या तिघी महिला पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे तपासात स्पष्ट झाले. परजिल्ह्यातून येऊन त्या चोऱ्या करतात.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस