शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

६७ वर्षांत चारच महिला आमदार - सांगली जिल्ह्यात यावर्षी तीनच महिला रिंगणात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 10:29 PM

सांगली विधानसभा मतदारसंघातून जयश्री अशोक पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तासगाव आणि सांगली विधानसभा मतदारसंघ सोडल्यास, सहा मतदारसंघात महिला उमेदवारच नाहीत.

ठळक मुद्देराजकारणात दुय्यम स्थानाबद्दल महिलांची सर्व राजकीय पक्षांबद्दल नाराजी

अशोक डोंबाळे ।सांगली : जिल्ह्यात नेत्यांच्या मांदियाळीत महिलांचे नेतृत्व झाकोळले गेले आहे. जिल्ह्याच्या ६७ वर्षांच्या राजकारणात केवळ सरोजिनी बाबर, श्रीमती कळंत्रे (आक्का), शालिनीताई पाटील, सुमनताई पाटील या चौघींनाच आमदार पदाची संधी मिळाली आहे. सध्याच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंंगणात तर तीनच महिला उमेदवार आहेत.

जिल्ह्यात विधानसभेची पहिली निवडणूक १९५२ मध्ये झाली. या पहिल्याच निवडणुकीमध्ये मिरज विधानसभा मतदारसंघातून श्रीमती कळंत्रे (आक्का), तर शिराळा विधानसभा मतदारसंघातून सरोजिनी बाबर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. या निवडणुकीत कळंत्रेआक्का व सरोजिनी बाबर या दोन्ही महिला विजयी झाल्या. त्यानंतर १९८० मध्ये सांगली विधानसभा मतदारसंघातून शालिनीताई पाटील यांना काँग्रेसकडून संधी मिळाली होती. या निवडणुकीत त्यांच्याविरोधात नामदेवराव मोहिते निवडणूक मैदानात होते. या निवडणुकीमध्ये शालिनीताई यांना ४४ हजार ३४१, तर मोहिते यांना १४ हजार ७९९ मते मिळाली होती.

शालिनीतार्इंनी विक्रमी २९ हजार ५४२ मताधिक्य घेऊन विजय मिळविला होता. त्यानंतर ३५ वर्षांनी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर २०१५ मध्ये राष्ट्रवादीने सुमनताई पाटील यांना तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली. सुमनताई पाटील विक्रमी एक लाख १२ हजार ९६३ मतांनी विजयी झाल्या.

राष्ट्रवादीने आता पुन्हा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून सुमनताई पाटील यांनाच उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात शिवसेनेचा उमेदवार आहे. मात्र यावेळी कुमठे (ता. तासगाव) येथील सुमनताई पाटील यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीत सुमनताई पाटील पुन्हा विजय खेचून आणणार का, हा चर्चेचा मुद्दा आहे. उर्वरित सात विधानसभा मतदारसंघात नारीशक्तीचा जयघोष करणाऱ्या एकाही पक्षाने महिलांना उमेदवारीच दिलेली नाही. सांगली विधानसभा मतदारसंघातून जयश्री अशोक पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तासगाव आणि सांगली विधानसभा मतदारसंघ सोडल्यास, सहा मतदारसंघात महिला उमेदवारच नाहीत.

जिल्ह्यात १२ लाख २१ हजार २१३ पुुरुष आणि ११ लाख ५३ हजार ०८६ महिला मतदार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाले आणि गावापासून महानगरांपर्यंत राजकीय क्षेत्रात महिलांची मोठी फळी उभी राहू लागली. जिल्हा परिषद अध्यक्ष, महापालिकेच्या महापौर पदापर्यंतची संधी त्यांना मिळाली. इतर मागासवर्ग, अनुसूचित जाती व जमातीतील महिलांना स्वतंत्र आरक्षण असल्यामुळे गावगाड्यातील उपेक्षित, शोषितांना प्रथमच राजकारणाचे अवकाश मोकळे झाले.

राजकारणात महिलांसाठी राखीव जागांमुळे, त्यांच्या सहभागामुळे सर्वसामान्य महिलांचे जीवनमान बदलू लागले आहे. कालपर्यंत शेतात खुरपणारी, चूल आणि मूल सांभाळणारी, खरकटे काढणारी स्त्री पंचायतीत जाऊन गावाचा कारभार पाहू लागली आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत ५० टक्के राहिले, किमान १० टक्के तरी महिलांना संधी देण्याचे धाडस राजकीय पक्षांनी दाखविण्याची गरज होती. पण, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राष्ट्रीय आणि स्थानिक राजकीय पक्षांनी सांगली जिल्ह्यातील महिलांना विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतील राजकारणापासून दूरच ठेवले आहे.

सांगली जिल्ह्यातील : महिला आमदारआमदार मतदारसंघ पक्ष वर्षकळंत्रेआक्का मिरज काँग्रेस १९५२सरोजिनी बाबर शिराळा काँग्रेस १९५२शालिनीताई पाटील सांगली काँग्रेस १९८०सुमनताई पाटील तासगाव-क.महांकाळ राष्ट्रवादी २०१५

सुमनताई पाटील यांना २0१५ च्या निवडणुकीत सव्वालाखाचे मताधिक्य.

टॅग्स :SangliसांगलीMLAआमदार