किरकाेळ वादातून तिघांना सळईने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:50 IST2020-12-17T04:50:58+5:302020-12-17T04:50:58+5:30

चैतन्य चव्हाण यांच्या घराच्या शेजारी नातेवाईक गणेश ज्ञानू साठे हे राहतात. मंगळवारी रात्री दहाच्या दरम्यान शेतातील काम आटोपून ...

Three were stabbed in a minor altercation | किरकाेळ वादातून तिघांना सळईने मारहाण

किरकाेळ वादातून तिघांना सळईने मारहाण

चैतन्य चव्हाण यांच्या घराच्या शेजारी नातेवाईक गणेश ज्ञानू साठे हे राहतात. मंगळवारी रात्री दहाच्या दरम्यान शेतातील काम आटोपून सर्वजण घरी आले. यावेळी शेजारच्या मनीषा साठे व कांचन साठे या, शेळीला बांधून घाला असे सांगितल्याने चैतन्य चव्हाण यांच्या आईशी वाद घालत होत्या. वाद वाढत असल्याचे पाहून चैतन्य यांनी वडील दिलीप चव्हाण व भाऊ विक्रम चव्हाण यांना फोन करून घरी बोलावले. दरम्यान, मनीषा यांचा मुलगा समाधानही आला. चैतन्य साठे, शुभम साठे, गणेश साठे, कांचन साठे हेही तिथे आले. त्यांंनी दिलीप चव्हाण, विक्रम चव्हाण व वनीता चव्हाण यांना लाेखंडी सळईने मारहाण केली.

याबाबत तासगाव पाेलीस ठाण्यात नेांद केली असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Three were stabbed in a minor altercation