निंबवडेत तिघा चोरट्यांंना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:32 IST2021-09-17T04:32:22+5:302021-09-17T04:32:22+5:30
निंबवडे येथे दि. १० सप्टेंबर रोजी रात्री बाळू हेगडे यांच्या घरासमोरील दुचाकी क्रमांक (एमएच १०, सीव्ही ४५२५) ही सुरज ...

निंबवडेत तिघा चोरट्यांंना अटक
निंबवडे येथे दि. १० सप्टेंबर रोजी रात्री बाळू हेगडे यांच्या घरासमोरील दुचाकी क्रमांक (एमएच १०, सीव्ही ४५२५) ही सुरज हेगडे आणि विष्णू हेगडे यांनी चोरली. ही दुचाकी ते ढकलत घेऊन जात असताना गावातील काहींनी पाहिले. याबाबतची माहिती बाळू हेगडे यांना मिळाल्यावर त्यांनी आटपाडी पोलिसात फिर्याद दिली होती.
तपासात पोलिसांनी संशयित सुरज हेगडे आणि विष्णू हेगडे यांना ताब्यात घेऊन चाैकशी केली असता, त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली. यावेळी त्यांनी परिसरात शेळ्या-मेढ्यांची चोरी केल्याची माहितीही पोलिसांना दिली. तसेच या चोरीत सुरज मुलाणी याचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर सुरज मुलाणी यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
या तिघांकडून अधिक चोऱ्या उघडकीला येण्याची शक्यता वर्तवली जात असून, पोलीस त्यादृष्टीने तपास करत आहेत. या कारवाईत पोलीस निरीक्षक भानुदास निंबोरे यांच्यासह हवालदार नितीन मोरे, नंदकुमार पवार, जगन्नाथ पुकळे, दिग्विजय कराळे, प्रमोद रोडे, उमर फकीर यांनी भाग घेतला.