शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

सांगली कारागृहात गांजा ओढणाऱ्या तिघा कैद्यांवर गुन्हा, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 11:39 IST

बाथरूममध्ये पकडले : कारागृहाची सुरक्षा चव्हाट्यावर

सांगली : येथील जिल्हा कारागृहातील बाथरूममध्ये गांजा ओढणाऱ्या सचिन बाबासाहेब चव्हाण (वय ३३, रा. कवठेपिरान), किरण लखन रणदिवे (२७, रा. कारंदवाडी), सम्मेद संजय सावळवाडे (२४, रा. आष्टा) या तिघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. कारागृहातील सुभेदार सूर्यकांत पाटील यांनी ‘एनडीपीएस’ ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.संशयित सचिन चव्हाण, किरण रणदिवे, सम्मेद सावळवाडे हे तिघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. सध्या ते न्यायालयीन बंदी आहेत. कारागृहात तिघांची ओळख झाली आहे. दि. २९ रोजी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास बॅरेक क्रमांक तीनच्य बाथरूममध्ये तिघेजण औषध गोळ्यांचे रिकामे पाकीट गोल गुंडाळून त्यात गांजा भरून चिलिमसारखे तयार करून गांजा ओढत होते. सुभेदार सूर्यकांत पाटील व हवालदार बबन पवार, शिपाई हणमंत पाटणकर हे बॅरेक क्रमांक ३ मध्ये राऊंड घेत फिरत होते. तेव्हा बाथरूममध्ये सचिन, किरण, सम्मेद हे तिघेजण गांजा ओढताना दिसून आले. त्यामुळे तिघांना ताब्यात घेतले. तेव्हा सचिन याच्याकडे औषध गोळ्याच्या रिकाम्या पाकिटाला गोल गुंडाळून त्याची चिलिम बनवून गांजा ओढल्याचे दिसून आले. अर्धवट जळालेला गांजा कारागृहातील पोलिसांनी जप्त केला. तत्काळ हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सुभेदार पाटील यांनी शनिवारी रात्री उशिरा सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तिघांवर एनडीपीएस ॲक्ट कलम २७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

गांजा आला कोठूनजिल्हा कारागृहात बाहेरून गांजा पुरवण्याचा प्रकार यापूर्वी घडला आहे. रबरी चेंडू, रिकाम्या बाटलीतून गांजा फेकण्याचे प्रकार अधून-मधून घडतात. आता थेट कैद्यांच्या हातात गांजा मिळाल्यानंतर ते गांजा ओढताना आढळल्यामुळे कारागृहाची सुरक्षितता पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.

तिघे रेकॉर्डवरील गुन्हेगारसचिन चव्हाण याला तीन साथीदारांसमवेत गांजा तस्करीप्रकरणी अटक करून २० लाखाचा गांजा जप्त केला होता. किरण रणदिवे हा बांधकाम व्यवसायिक माणिक पाटील यांच्या खुनातील संशयित आहे. सम्मेद सावळवाडे हा देखील खुनातील संशयित आहे. त्याने दोघांच्या मदतीने तरुणाचे अपहरण करून खून केल्याचा गुन्हा दाखल आहे.

सुरक्षेबाबत प्रश्नचिन्हपुण्यातील गुंड गजा मारणे याला सांगलीतील कारागृहात आणले आहे. त्यामुळे येथील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तरीही सुरक्षा व्यवस्था भेदून थेट गांजा कैद्याच्या हातात पडल्यामुळे सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

टॅग्स :SangliसांगलीPrisonतुरुंगPoliceपोलिस