जिल्ह्यातून तिघेजण बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:21 IST2021-02-05T07:21:57+5:302021-02-05T07:21:57+5:30
... सांगलीत महिलेस मारहाण सांगली : हरभट रस्त्यावरील एका कापडाच्या दुकानात महिलेस शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी जस्मिन ...

जिल्ह्यातून तिघेजण बेपत्ता
...
सांगलीत महिलेस मारहाण
सांगली : हरभट रस्त्यावरील एका कापडाच्या दुकानात महिलेस शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी जस्मिन अब्दुल रशीद मंडल (रा. गवळी गल्ली) या महिलेविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. ही घटना रविवारी दुपारी घडली. ललिता अनिल कुकडे यांनी फिर्याद दिली.
...
अंकली रस्त्यावरील
अपघातात एकाचा मृत्यू
सांगलीः अंकली (ता. मिरज) येथील ओमकिरण धाब्याजवळ चारचाकी आणि दुचाकी यांच्या झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. प्रल्हाद बाबुराव सूर्यवंशी (वय ५५, रा. हिंद विजय कॉलनी, इनामधामणी) असे त्यांचे नाव आहे. येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.