शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: घाणंद येथे जमीन वादातून कुऱ्हाड, काठीने मारामारी, महिलेसह तिघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 15:39 IST

दोन परस्परविरोधी गुन्हे दाखल 

आटपाडी : घाणंद (ता. आटपाडी) गावात ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी दोन कुटुंबांमध्ये शेतजमिनीच्या मालकी व वापर हक्कावरून मोठा वाद झाला. या वादाचे मारामारीत रूपांतर झाले. दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध फिर्याद दिल्याने आटपाडी पोलिस ठाण्यात दोन्ही बाजूविरुद्ध दोन परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.आटपाडी पोलिस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, बबन शिंदे (वय ६५, रा. घाणंद) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी बबन शिंदे आपल्या शेतात असताना गावातील पांडुरंग जयसिंग शिंदे, नारायण शिंदे, सर्जेराव माने आणि हेमलता शिंदे यांनी त्यांना शिवीगाळ केली आणि हाताने मारहाण केली. या घटनेत बबन शिंदे यांना दुखापत झाली. या प्रकरणी बीएनएस कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याच घटनेच्या संदर्भात, सर्जेराव जयसिंग शिंदे (वय ४५, रा. घाणंद) यांनी दुसरी बाजू मांडत पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार, ६ ऑगस्ट रोजी त्यांच्या शेताजवळील आर.के. मंगल कार्यालयाच्या बाजूच्या पडीक शेतजमिनीवर बबन शिंदे यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या शेळ्या भाडेपट्टीतील शेतात सोडल्याने वाद झाला. विचारणा केल्यावर, सागर बबन शिंदे आणि संदेश बबन शिंदे यांनी शिवीगाळ करत हल्ला चढवला. सागर शिंदेने कुऱ्हाडीने सर्जेराव यांच्यावर वार केला. सर्जेराव नंतर घरी गेले आणि पत्नी, मुलगा व मुलगी घेऊन घटनास्थळी परत आले. तेव्हा छाया बबन शिंदे हिने मारहाण केली, तर संदेशने सर्जेराव यांच्या पत्नीला आणि मुलगी सोनालीच्या डोक्यावर काठीने प्रहार केला. या घटनेत तीनजण जखमी झाले. या प्रकरणी बीएनएस कलम १२६(२), ११५(२), १३१, ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जखमींना वैद्यकीय तपासणीसाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घाणंद गावात या घटनेनंतर काहीसा तणाव निर्माण झाला असून, पोलिस बंदोबस्त आहे.