गांजाप्रकरणी आणखी तिघांना अटक -संशयित विसापूर, तुरची, सांगोला तालुक्यातील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 20:33 IST2018-03-12T20:33:54+5:302018-03-12T20:33:54+5:30
तासगाव : तुरची (ता. तासगाव) येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये सापडलेल्या गांजाप्रकरणी आता अटक केलेल्यांची संख्या दोनवरुन पाचवर गेली आहे. तर हा गांजा थेट सोलापूर जिल्ह्यातून येत असल्याचा गौप्यस्फोट

गांजाप्रकरणी आणखी तिघांना अटक -संशयित विसापूर, तुरची, सांगोला तालुक्यातील
तासगाव : तुरची (ता. तासगाव) येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये सापडलेल्या गांजाप्रकरणी आता अटक केलेल्यांची संख्या दोनवरुन पाचवर गेली आहे. तर हा गांजा थेट सोलापूर जिल्ह्यातून येत असल्याचा गौप्यस्फोट तपासात उघड झाला आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संदीप संपत रास्ते (वय ३०, रा. विसापूर), अमर सूर्यवंशी (वय २८, रा. तुरची) व गणेश भाऊ साळुंखे (वय ३२, रा. लक्ष्मी चौक, रा. कोळे, ता. सांगोला) यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत सहायक पोलिस निरीक्षक उमेश दंडिले यांनी दिलेली माहिती अशी की, तुरची पोलिस प्रशिक्षण केंद्रात गांजा सापडल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थी जतीन दत्ता कालकडे (मुंबई प्रशिक्षणार्थी, रा. मुंबई) व स्वच्छता कामगार जीवन श्रीपती कांबळे (रा. सिध्दार्थनगर, पलूस) यांनी हा गांजा वरील तिघांकडून मिळत असल्याचे सांगितले.
या जबाबावरुन तासगाव पोलिसांनी संदीप रास्ते, अमर सूर्यवंशी व गणेश साळुंखे यांना अटक केली. दरम्यान ही गांजाची लिंक मोठी असल्याचा संशय दंडिले यांनी व्यक्त केला.
आणखी काही जण या संशयाच्या भोवर्यात असल्याचेही ते म्हणाले.दरम्यान सांगलीसह सोलापूर जिल्ह्यातून हा गांजा तुरची पोलीस प्रशिक्षण केंद्रात छुप्या मागार्ने येत असल्याचे समोर आल्यानंतर गणेश साळुंखे याच्या घरातून आणखी एक किलो ४७ ग्रॅम वजनाचा गांजा ताब्यात घेण्यात आला असल्याचेही पोलिसांनी सांगितले.