व्यवस्थापकासह तिघांवर गुन्हा

By Admin | Updated: September 25, 2014 00:33 IST2014-09-24T23:34:19+5:302014-09-25T00:33:58+5:30

जिल्हा बॅँक अपहार : दीड महिन्यापूर्वी प्रकार उघडकीस

Three offenders with the manager | व्यवस्थापकासह तिघांवर गुन्हा

व्यवस्थापकासह तिघांवर गुन्हा

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तुंग येथील शाखेत २६ लाख ४६ हजार ७०० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शाखेचे व्यवस्थापक जमीर नसरुद्दीन सनदी (रा. कसबे डिग्रज, ता. मिरज), लिपिक प्रतापराव पांडुरंग धनवडे (रा. बागणी, ता. वाळवा) व शिपाई नंदकुमार रामचंद्र मोरे (रा. कसबे डिग्रज) यांच्याविरोधात आज (बुधवार) सायंकाळी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दीड महिन्यापूर्वी हा अपहार उघडकीस आला होता.
तुंग येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत २६ लाख ४६ हजार ७०० रुपयांचा अपहार झाल्याचे बँकेच्या लेखापरीक्षणात उघडकीस आले होते. यानंतर बँक अधिकाऱ्यांनी याची तपासणी करून याला जबाबदार असणाऱ्यांवर ठपका ठेवला होता. त्यानुसार शाखा व्यवस्थापक सनदी, लिपिक धनवडे व शिपाई मोरे यांच्याविरोधात आज बँक अधिकारी फारुक बादशहा फरांडे (रा. पेठभाग, सांगली) यांनी फिर्याद दिली.
या तिघांनी गावातील ठेवीदारांकडून रोजची ठेव व कर्जदारांकडून कर्जाचे हप्ते घेतले, मात्र ही रक्कम बँकेत जमा न करता संगनमत करून परस्पर हडप केली. याबाबत ग्राहकांना बोगस नोंदी करून दिल्या. याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक पी. डी. जाधव करीत आहेत. (प्रतिनिधी)

लाखांचा घोटाळा
जिल्हा बँकेच्या तुंग शाखेत लिपिक व शिपायाने गावातील लोकांची देणी भागविण्यासाठी अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर बँकेच्या पथकाने अपहाराची चौकशी केली. २६ लाखांचा अपहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

Web Title: Three offenders with the manager

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.