शिराळा तालुक्यात तीन नवीन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:09 IST2020-12-05T05:09:47+5:302020-12-05T05:09:47+5:30
शिराळा : शिराळा तालुक्यात शुक्रवारी दिवसभरात ११८ अँटिजेन चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये कोरोनाचे नवीन ३ रुग्ण आढळून आले. तालुक्यात ...

शिराळा तालुक्यात तीन नवीन रुग्ण
शिराळा : शिराळा तालुक्यात शुक्रवारी दिवसभरात ११८ अँटिजेन चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये कोरोनाचे नवीन ३ रुग्ण आढळून आले. तालुक्यात सध्या ९ रुग्ण उपचाराखाली आहेत.
शुक्रवारी तडवळे येथे २, तर शिरशी येथे १ असे ३ नवीन रुग्ण आढळून आले. आतापर्यंत तालुक्यातील ९८ पैकी ९३ गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के आहे. शुक्रवारअखेर तालुक्यात १० हजार ६८५ अँटिजेनू तर ६ हजार ८३१ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये २ हजार १८६ रुग्ण आढळून आले. यापैकी २ हजार ९१ रुग्ण काेराेनामुक्त झाले आहेत. सध्या होम आयसोलेशनमध्ये ६, तर उपजिल्हा रुग्णालयात ३ असे ९ रुग्ण उपचाराखाली आहेत. आजअखेर शिराळा शहरातील १४ रुग्णांसाह तालुक्यातील ९२ जणांचा मृत्यू झाला असून, मृत्यूचे प्रमाण ४.२ टक्के आहे.