सांगलीतून तीन मोबाईल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:28 IST2021-07-30T04:28:36+5:302021-07-30T04:28:36+5:30

सांगली : शहरातील विविध भागांतून चोरट्यांनी ६० हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल लंपास केले. शहरातील गणेशनगर, गणपती पेठ परिसरात ...

Three mobile lamps from Sangli | सांगलीतून तीन मोबाईल लंपास

सांगलीतून तीन मोबाईल लंपास

सांगली : शहरातील विविध भागांतून चोरट्यांनी ६० हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल लंपास केले. शहरातील गणेशनगर, गणपती पेठ परिसरात चोरीचे हे प्रकार घडले. शहर पोलिसांत या घटनांची नोंद आहे.

मयूर चंद्रकांत गाला (रा. कॉलेज कॉर्नर,सांगली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गाला यांच्या गणपती पेठमध्ये रमेश लाईट नावाच्या दुकानातील बुधवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास चोरट्यांनी ५० हजार रुपये किमतीचा मोबाईल लंपास केला. फिर्यादी मयूर हे दुकानाच्या पाठीमागे गोडावूनमध्ये गेले असता अर्धवट उघड्या असलेल्या शटरमधून चोरट्यांनी मोबाईल लंपास केला.

जयमाला धैर्यशील पाटील (रा. गणेशनगर,सांगली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी स्वयंपाकघरात कामात असताना, एक महिला व दोन मुलांनी घरात प्रवेश करून दोन मोबाईल चोरून नेले.

Web Title: Three mobile lamps from Sangli