बुधगावजवळ ट्रक उलटून तीन लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:26 IST2021-07-31T04:26:25+5:302021-07-31T04:26:25+5:30
बुधगाव : बुधगाव (ता. मिरज) येथे सांगली- तासगाव मार्गावर गव्हाची वाहतूक करणारा ट्रक पंक्चर झाल्याने रस्त्यावर उलटला. अपघातात सुमारे ...

बुधगावजवळ ट्रक उलटून तीन लाखांचे नुकसान
बुधगाव : बुधगाव (ता. मिरज) येथे सांगली- तासगाव मार्गावर गव्हाची वाहतूक करणारा ट्रक पंक्चर झाल्याने रस्त्यावर उलटला. अपघातात सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात घडला. ट्रक मध्यप्रदेशहून सांगली मार्केट यार्डकडे येत होता.
सांगलीतील मार्केट यार्डातील एका व्यापाऱ्याने तीस टन गहू मध्यप्रदेशमधून मागविला होता. हा गहू घेऊन ट्रक (क्र. आरजे-०९ जीडी-८१९) सांगलीकडे येत हाेता. बुधगाव स्मशानभूमीजवळील वळणावर शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास ट्रकचे मागील एक चाक पंक्चर झाले. अचानक पंक्चर झालेले चाक व चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने ट्रक रस्त्यावरच उलटला. अपघातात चालक व क्लीनर किरकोळ जखमी झाले. मात्र, गव्हाची पोती फुटून सुमारे अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले.