सांगलीत कौटुंबिक वादातून तिघांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:25 IST2021-04-11T04:25:19+5:302021-04-11T04:25:19+5:30
सांगली : शहरातील गणेशनगर परिसरात पती-पत्नीमध्ये असलेल्या वादातून तिघांना दांडके, चॉपर आणि चाकूने मारहाण करून जखमी करण्यात आले. याप्रकरणी ...

सांगलीत कौटुंबिक वादातून तिघांना मारहाण
सांगली : शहरातील गणेशनगर परिसरात पती-पत्नीमध्ये असलेल्या वादातून तिघांना दांडके, चॉपर आणि चाकूने मारहाण करून जखमी करण्यात आले. याप्रकरणी श्रावणी गणेश सातपुते (वय ३१, रा. नुराणी मस्जीदजवळ, सांगली) यांनी पती गणेश सातपुतेसह त्याचे मित्र राहुल मोने, रोहित सातपुते, जाफर पठाण, हैदर पठाण, गणेश मोरे (सर्व रा. रमामातानगर, सांगली) यांच्याविरोधात शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी श्रावणी व तिचा पती गणेश यांच्यात घटस्फोटाच्या कारणावरून वाद आहे. शुक्रवारी याच वादातून संशयिताने श्रावणी यांच्या घराजवळ मारहाण केली. त्यानंतर त्या कामावर जात असताना, गणेशनगर येथील जलतरण केंद्राजवळ पुन्हा मारहाण केली. याचवेळी श्रावणीचा भाऊ व मित्र भांडण सोडविण्यास आले असताना त्यांना दांडके, चॉपर आणि चाकूने मारून जखमी केले. यात शुभमकुमार शिकलगार, सुज्योत सुनील कांबळे, अक्षय जाधव हे तिघे जखमी झाले. कौटुंबिक कारणावरून यापूर्वीही गणेशने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.