बनेवाडीत किरकोळ कारणातून तिघांवर खुनीहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:16 IST2021-02-20T05:16:02+5:302021-02-20T05:16:02+5:30

याबाबत सुमित संजय यादव (वय २२) याने पोलिसात फिर्याद दिली आहे. या हल्ल्यात सुमितसह, रोहित सुरेश यादव आणि प्रतीक ...

Three killed in Banewadi for petty reasons | बनेवाडीत किरकोळ कारणातून तिघांवर खुनीहल्ला

बनेवाडीत किरकोळ कारणातून तिघांवर खुनीहल्ला

याबाबत सुमित संजय यादव (वय २२) याने पोलिसात फिर्याद दिली आहे. या हल्ल्यात सुमितसह, रोहित सुरेश यादव आणि प्रतीक विजय यादव हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सुहास एकनाथ यादव, सुनीता सुहास यादव, जितेंद्र एकनाथ यादव आणि कविता जितेंद्र यादव (सर्व रा. बनेवाडी) यांच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. सर्व जखमींवर मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सुमित यादव हा दुचाकीवरून ताकारीहून बनेवाडीकडे परत येत होता. सुहास यादव याच्या घरासमोरून जात असताना, सुहासने सुमितच्या दुचाकीच्या आडवा ट्रॅक्टर मारला. यावर सुमितने माझ्या दुचाकीच्या आडवा ट्रॅक्टर का मारलास? अशी विचारणा केल्यावर सुहासने त्याला शिवीगाळ केली. त्यानंतर चौघाजणांनी सुमितच्या घराजवळ जाऊन कोयता, लोखंडी टॉमी आणि काठीने सुमितवर हल्ला चढविला. सुमितच्या डाव्या हातावर कोयत्याचा वार झाला.यावेळी मध्ये आलेल्या रोहित सुरेश यादव याच्यावरही कोयत्याने वार केला, तर प्रतीक यादव याला बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केली. त्यानंतर सर्व हल्लेखोरांनी पलायन केले.

Web Title: Three killed in Banewadi for petty reasons