शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आष्ट्यात मोक्कातील फरारी तीन गुंडांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 13:35 IST

सांगली : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यांतर्गत पोलिसांनी केलेल्या कारवाईची चाहूल लागताच, फरार झालेल्या तीन गुंडांना आष्टा (ता. वाळवा) ...

ठळक मुद्देआष्ट्यात मोक्कातील फरारी तीन गुंडांना अटकगंभीर गुन्हे : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून घरावर छापे

सांगली : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यांतर्गत पोलिसांनी केलेल्या कारवाईची चाहूल लागताच, फरार झालेल्या तीन गुंडांना आष्टा (ता. वाळवा) येथे त्यांच्या घरातून अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने रविवारी सकाळी या तीनही गुंडांना घरावर छापे टाकून पकडले.अटक केलेल्यांमध्ये उदय रघुनाथ मोरे (वय २७, रा. तेली गल्ली, आष्टा), मिथुन बाळासाहेब भंडारे (२९) व अभिषेक ऊर्फ मन्या आनंद हाबळे (१९, डांगे कॉलेजशेजारी, आष्टा) यांचा समावेश आहे.सहा जणांच्या टोळीला दीड महिन्यापूर्वी मोक्का लावण्यात आला होता. त्यावेळी टोळीतील तालीब लियाकत मुजावर (२३, राम मंदिरजवळ, आष्टा), अजिंक्य अरुण सावळवाडे (२०, घोरपडे गल्ली, आष्टा) व सागर प्रकाश वाघमोडे (२०, सुतार गल्ली, आष्टा) यांना अटक करण्यात आली होती, तर या कारवाईची चाहूल लागताच उदय मोरे याच्यासह मिथुन भंडारे व अभिषेक हाबळे पसार झाले होते.जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी त्यांना पकडण्याचे आदेश दिले होते. हे हे तिघेही आष्टा येथील त्यांच्या घरी आल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना रविवारी सकाळी मिळाली होती.

त्यानंतर पिंगळे यांच्या पथकाने त्यांच्या घरावर छापे टाकले. छाप्याची चाहूल लागताच तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तत्पूर्वीच त्यांना पकडण्यात आले. त्यांना पुढील तपासासाठी आष्टा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.पोलीस उपनिरीक्षक अंतम खाडे, सहायक फौजदार विजय पुजारी, हवालदार अशोक डगळे, सुनील चौधरी, संदीप पाटील, सतीश आलदर, अनिल कोळेकर व सलमान मुलाणी यांनी या कारवाईत सहभाग घेतला.टोळीविरुद्ध १२ गुन्हेआष्ट्यातील या टोळीविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी, मारामारी, दुखापत करणे असे १२ अशा गुन्यांचा समावेश आहे. टोळीतील गुंडांना पोलिसांनी यापूर्वीही अनेकदा अटक केली होती.

पण जामिनावर बाहेर आल्यानंतर ते पुन्हा गुन्हे करीत होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध तडीपारीचा प्रस्ताव तयार केला होता. तत्कालीन पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगलीPoliceपोलिस