मालगावात तिघांना मारहाण; नऊ जणांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:31 IST2021-08-13T04:31:04+5:302021-08-13T04:31:04+5:30
मारहाणीत सूर्यकांत सावकार, सदानंद रामचंद्र सावकार व रामचंद्र सावकार हे तिघे जखमी झाले. मारहाणप्रकरणी सूर्यकांत सावकार यांनी निखिल संजय ...

मालगावात तिघांना मारहाण; नऊ जणांविरुद्ध गुन्हा
मारहाणीत सूर्यकांत सावकार, सदानंद रामचंद्र सावकार व रामचंद्र सावकार हे तिघे जखमी झाले. मारहाणप्रकरणी सूर्यकांत सावकार यांनी निखिल संजय तिवारी (वय २८), विजय शंकर पवार (३५), शीतल अण्णासो आरगे (३०) प्रमोद ऊर्फ बंड्या राजू पवार (२४) व अन्य पाच अनोळखी अशा नऊ जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे.
सूर्यकांत सावकार हे भाऊ सदानंद सावकार यांच्यासोबत बोलत होते. यावेळी फोनवरून झालेल्या वादातून नऊ जणांनी सूर्यकांत सावकार व सदानंद सावकार या दोघांना शिवीगाळ व मारहाण केली. विजय पवार याने काठीने मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी आलेले रामचंद्र सावकार यांनाही शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचे सूर्यकांत सावकार यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
----------
वड्डीतून दुचाकी चोरी
मिरज : वड्डी (ता. मिरज) येथून सुशांत बाळासाहेब वाघमोडे यांची सात हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञाताने चोरून नेली. याबाबत वाघमोडे यांनी मिरज ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे.