मिरजेत वाहनांच्या बॅटऱ्या चोरणारे तिघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:30 IST2021-09-12T04:30:35+5:302021-09-12T04:30:35+5:30

नियाजअहमद जैनुददीन शेख (रा. मुजावर गल्ली, मिरज) यांच्या मालकीचा ट्रक दि. ५ रोजी रात्री अक्षय हॉटेलसमोर रस्त्यावर ...

Three arrested for stealing vehicle batteries in Miraj | मिरजेत वाहनांच्या बॅटऱ्या चोरणारे तिघे ताब्यात

मिरजेत वाहनांच्या बॅटऱ्या चोरणारे तिघे ताब्यात

नियाजअहमद जैनुददीन शेख (रा. मुजावर गल्ली, मिरज) यांच्या मालकीचा ट्रक दि. ५ रोजी रात्री अक्षय हॉटेलसमोर रस्त्यावर उभा केला होता. त्यांच्या ट्रकमधील बॅटरी व ट्रकमागे असलेल्या आणखी दोन ट्रकमधुन बॅटरी चोरुन नेण्यात आल्या. याबाबत गांधी चाैक पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यांत आला हाेता. पोलिसांनी रेकॉर्डवरील चोरटा रिजवान रफिक पठाण (रा. ख्वाजा वस्ती मिरज) व त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांनी ट्रकमधून बॅटऱ्या चोऱ्या करीत असल्याची कबुली दिली. बॅटऱ्या चोरीसाठी वापरत असलेली रिक्षा (क्र. एमएच १० के ४५१९) व २० हजार रुपये किमतीच्या तीन बॅटऱ्या हस्तगत करण्यांत आल्या. सहाय्यक निरीक्षक रविराज फडणीस, पोलीस उपनिरीक्षक राजु अत्रे, सहा फौजदार सुभाष पाटील, ए. एन. खंडागळे, हवालदार दुष्यंत ढेंबरे, चंद्रकांत गायकवाड, अमर मोहिते, रिचर्ड स्वामी, बाळासाहेब निळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Three arrested for stealing vehicle batteries in Miraj