जनावरे चोरी करणाऱ्यां तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:19 IST2021-07-20T04:19:54+5:302021-07-20T04:19:54+5:30

समीर लाला दरवेशी (वय २२), गजेंद्र यशवंत लांडगे (वय ३७ दोन्ही रा. हंगिरगे ता. सांगोला. जिल्हा सोलापूर) व रहीम ...

Three arrested for stealing animals | जनावरे चोरी करणाऱ्यां तिघांना अटक

जनावरे चोरी करणाऱ्यां तिघांना अटक

समीर लाला दरवेशी (वय २२), गजेंद्र यशवंत लांडगे (वय ३७ दोन्ही रा. हंगिरगे ता. सांगोला. जिल्हा सोलापूर) व रहीम दस्तगीर दरवेशी (वय २५ रा. पाडळी ता. हातकणंगले जि. कोल्हापूर), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

कुरळप पोलिसांना तांदळवाडी येथे पुणे-बेंगलोर महामार्गावर पेट्रोलिंग करत असताना तीन संशयित आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडे चाैकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी तिघांना कुरळप पोलीस ठाण्यात नेले. यावेळी तपासात समीर याच्यावर सांगोला व कवठेमहांकाळ येथे जनावरे चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. यानंतर तिघांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी जनावरे चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ऐतवडे खुर्द येथील चोरीतील दोन म्हशी व येलूर येथील एक रेडकू जप्त केले आहे.

Web Title: Three arrested for stealing animals