तलाठ्यावर हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:25 IST2021-03-28T04:25:26+5:302021-03-28T04:25:26+5:30

जत : सोरडी (ता. जत) येथील गावकामगार तलाठी व तलाठी संघटनेचे जत तालुकाध्यक्ष बाळासाहेब शंकर जगताप (वय ५३, रा. ...

Three arrested in attack on Talatha | तलाठ्यावर हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक

तलाठ्यावर हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक

जत : सोरडी (ता. जत) येथील गावकामगार तलाठी व तलाठी संघटनेचे जत तालुकाध्यक्ष बाळासाहेब शंकर जगताप (वय ५३, रा. विद्यानगर, जत) यांना काठी व दगडाने मारहाण करून विळ्याने हल्ला केल्याच्या आरोपावरून तिघा वाळूतस्करांना अटक करण्यात आली. लक्ष्मण पुतळाप्पा चाबरे, राहुल लक्ष्मण चाबरे, बिरा शंकर चाबरे (सर्व रा. चाबरे वस्ती, सोरडी), अशी त्यांची नावे आहेत.

जत येथील न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

बाळासाहेब जगताप चाबरेवस्ती येथील बेकायदेशीर वाळूच्या साठ्याचा फोटो काढून पंचनामा करण्यासाठी शुक्रवारी दुपारी गेले असता येथील वाळू तस्कर व सुमारे ११ पुरुष आणि महिलांनी त्यांना काठी, दगडाने मारहाण करून विळ्याने हल्ला केला होता. डाव्या हाताच्या करंगळीवर वार झाल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. उपचारार्थ त्यांना सांगली येथे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी बाळासाहेब जगताप यांनी ११ जणांविरोधात जत पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाळ भोसले करीत आहेत.

Web Title: Three arrested in attack on Talatha