जत तालुक्यात वीज पडून तीन जनावरांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:28 IST2021-04-28T04:28:29+5:302021-04-28T04:28:29+5:30

संख : जत तालुक्यात गोंधळवाडी, लकडेवाडी, जाडरबोबलाद येथे वीज पडून तीन जनावरांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन लाख पाच हजार ...

Three animals die in lightning strike in Jat taluka | जत तालुक्यात वीज पडून तीन जनावरांचा मृत्यू

जत तालुक्यात वीज पडून तीन जनावरांचा मृत्यू

संख : जत तालुक्यात गोंधळवाडी, लकडेवाडी, जाडरबोबलाद येथे वीज पडून तीन जनावरांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन लाख पाच हजार रुपयांचे नुकसान झाले. नुकसानीचा पंचनामा केला आहे.

तालुक्यात सोमवारी विजेचा कडकडाट, ढगांच्या गडगडासह दुपारी ४ नंतर अचानक ढगांची दाटी झाली. काल रात्रभर झालेल्या अवकाळी पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

गोंधळेवाडी येथील शेतकरी निल्लव्वा मायप्पा पांढरे यांंच्या म्हैशीवर वीज पडून मृत्यू झाला. ७० हजार रुपयांचे नुकसान झाले.

जाडरबोबलाद येथील शेतकरी परशुराम शिवप्पा ऐनापुरे यांची गाईचा मृत्यू झाला. त्यांचे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले. लकडेवाडी येथील शिवाजी सुखदेव लकडे यांची गाय वीज पडून मृत्यू झाली. ६५ हजार रुपयांचे नुकसान झाले.

गोंधळेवाडी, जाडरबोबलाद, लकडेवाडी येथे प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला. जाडरबोबलादचे तलाठी विनायक बालटे, लकडेवाडीचे नितीन कुंभार, संखचे राजेश चाचे, गणेश पवार यांनी पंचनामा केला.

Web Title: Three animals die in lightning strike in Jat taluka