व्यापाऱ्याचा साडेतीन लाखांचा गूळ पळविला
By Admin | Updated: October 21, 2014 23:41 IST2014-10-21T22:05:50+5:302014-10-21T23:41:29+5:30
सांगलीत तक्रार : ट्रकचालक बेपत्ता; हैदराबादला जाणारा माल लंपास

व्यापाऱ्याचा साडेतीन लाखांचा गूळ पळविला
सांगली : सांगलीतील व्यापाऱ्याचा सांगलीतून हैदराबादला पाठविलेला सुमारे साडेतीन लाखांचा गूळ घेऊन ट्रकचालक बेपत्ता झाला आहे. हा प्रकार १६ आॅक्टोबरला झाला असून, याबाबत गूळ व्यापारी रमेश वसा (वय ६७, रा. जवाहर हौसिंग सोसायटी, सांगली) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. रमेश वसा यांनी हैदराबादला १६ आॅक्टोबर रोजी ३ लाख ४९ हजार रुपयांचा गूळ पाठविला होता. हा गूळ त्यांनी श्रीमंत कासीम कुरे (रा. वरुण बाग, बिसूर, कर्नाटक) यांच्या मालकीच्या ट्रक (क्र. एम. एच. ४३ ए, १६२८) मधून पाठविला होता. दुसऱ्या दिवशी हा ट्रक हैदराबाद येथील गूळ व्यापाऱ्याकडे पोहोचणे आवश्यक असताना, सहा दिवस झाले तरी, अद्याप गूळ पोहोचलेला नाही. याबाबत अधिक चौकशी केली असता, ट्रकचालक मच्छिंद्र हणमंत कोळी (रा. नारायणपुरी, बिसूर) ट्रक घेऊन गायब झाल्याचे स्पष्ट झाले. (प्रतिनिधी)