चिंचोलीत तीन एकरातील गवत खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:23 IST2020-12-08T04:23:30+5:302020-12-08T04:23:30+5:30

कोकरुड : चिंचोली (ता. शिराळा) येथील गळोबा देवाच्या गवताच्या डोंगर परिसरात अज्ञाताने लावलेल्या आगीत सुमारे तीन एकराच्या परिसरातील गवत ...

Three acres of grass in Chincholi | चिंचोलीत तीन एकरातील गवत खाक

चिंचोलीत तीन एकरातील गवत खाक

कोकरुड : चिंचोली (ता. शिराळा) येथील गळोबा देवाच्या गवताच्या डोंगर परिसरात अज्ञाताने लावलेल्या आगीत सुमारे तीन एकराच्या परिसरातील गवत खाक झाले.

रविवारी सायंकाळी गळोबा देवाच्या डोंगर परिसरातील गवताच्या रानाला अज्ञाताने लावलेली आग कोकरूड येथे राहत असलेल्या वनविभागाच्या वनरक्षक देवकी तहसीलदार यांना दिसली. त्यांनी परिसरातील वनकर्मचारी बाळू चव्हाण, दादा शेटके, अधिक शेटके यांना फोनवरून तातडीने बोलावून घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी घटनास्थळाकडे धाव घेतली. चिंचोलीतील युवकांना व ग्रामस्थांना येथील डाॅक्टर नंदकुमार पाटील यांनीही फोनवरून माहिती दिली. दोन तास प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली. सर्जेराव जाधव, प्रदीप जाधव, आबासाहेब जाधव, अमोल गुरव, कुलदीप जाधव, धनाजी जाधव, वैभव जाधव आदी युवकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी भाग घेतला.

फोटो ओळी :चिंचोली (ता. शिराळा) येथील गवताच्या डोंगर परिसरात अज्ञाताने लावलेली आग आटोक्यात आणली.

Web Title: Three acres of grass in Chincholi