शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले...
2
"मराठी माणूस खतरे में है, मग ३० वर्ष तुम्ही..." फडणवीस यांचा ठाकरेंवर निशाणा
3
BMC Elections 2026 : "काहींना निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो, इतरवेळी नेटफ्लिक्स..." एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
4
अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधीची ऑफर, 'त्या' उमेदवारांना स्टेजवरच बोलावले; राज ठाकरेंचा घणाघात
5
केजी टू पीजी मोफत शिक्षण, मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल; नवी मुंबईत भाजपाचा जाहीरनामा
6
WPL मध्ये २४ तासांच्या आत विक्रमाची पुनरावृत्ती! ग्रेसनं केली सोफीची बरोबरी; त्यातही कमालीचा योगायोग
7
धक्कादायक! OTP किंवा लिंक नाही, आता तुमचा आवाज बँक खाते रिकामे करणार, बोलणे पडणार महागात
8
'आम्हाला युद्ध नको, पण...', ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचे प्रत्युत्तर, खामेनेई आर-पारच्या मूडमध्ये
9
WPL 2026 : आरसीबीच्या ताफ्यातील ब्युटीनं एका ओव्हरमध्ये २ विकेट्स घेत मैफील लुटली, पण...
10
अजित पवारांना मोठा झटका! मतदानाच्या आधीच राष्ट्रवादीचा उमेदवारच भाजपात; BJP ला दिला पाठिंबा
11
KL Rahul Break Kohli Record: बिग सरप्राइज! KL राहुलनं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड! MS धोनी नंबर वन
12
बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! रॉयल एनफिल्डनं Goan Classic 350 मध्ये केला जबरदस्त बदल
13
"तुझ्या वडिलांना तीन-तीन गोळ्या घ्याव्या लागतात, मी..."; गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर घणाघात, एकनाथ शिंदेंनाही इशारा
14
अंबरनाथमध्ये शिंदेसेनेची खेळी, भाजपाला बसला झटका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लागली लॉटरी
15
WPL 2026 : मुंबई इंडियन्सचा सामना प्रेक्षकांविना खेळवण्याची वेळ; जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Pune Municipal Election: "...तर मला दिल्लीत जाऊन चर्चा करावी लागेल"; युती धर्माच्या विधानानंतर अजित पवारांचा इशारा
17
भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
18
सायबर हल्ल्यापासून बचावासाठी वापरा USB कंडोम, कुठे अन् कसा वापर करायचा? जाणून घ्या...
19
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची अचानक तब्येत बिघडली; दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल
20
Crime: सेक्ससाठी नकार देणाऱ्या पत्नीची गळा आवळून हत्या, पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळं फुटलं पतीचं पितळ!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: प्रेमसंबंधासाठी त्रास देऊन बदनामीची धमकी; विवाहितेची आत्महत्या, चुलत दिराविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 15:35 IST

तेव्हा मृत विवाहितेच्या आईने त्याला खडसावले होते.

सांगली : प्रेमसंबंध ठेवण्यासाठी सतत त्रास देऊन बदनामीची धमकी देत पूजा राहुल देसाई (वय २४) हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चुलत दीर अभिषेक उत्तम देसाई (रा. मार्डी, ता. माण, जि. सातारा) याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मृत पूजा यांची आई छाया मुगटराव ननावरे (रा. खुटबाव, ता. माण) यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पूजा आणि राहुल अशोक देसाई यांचा विवाह २०१९ मध्ये झाला होता. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. विवाहानंतर पूजा ही सासरी मार्डी येथे राहण्यास होती. २०२१ मध्ये तिचा चुलत दीर अभिषेक याने पूजा हिचा हात पकडला होता. तिने आईला हा प्रकार सांगताच त्यांनी अभिषेकला जाब विचारला. तेव्हा त्याने ‘मला पूजाशी लग्न करायचे होते’ असे सांगितले. तेव्हा पूजाच्या आईने त्याला खडसावले होते.त्यानंतर पूजाचे पती राहुल यांची सांगलीला बदली झाल्यामुळे ते विश्रामबाग येथे राहण्यास आले. तरीही अभिषेक हा वारंवार पूजाला फोन करून त्रास देत होता. मला तुझ्याशी लग्न करायचे होते. तू माझ्याशी फोनवर बोलली नाहीस तर तुझ्या पतीला सांगून बदनामी करेन अशी धमकी देत होता.दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी पूजाने पुन्हा एकदा आईला दीर अभिषेक हा कॉल करून त्रास देत असल्याचे सांगितले. त्यानंतर सायंकाळी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकारानंतर धक्का बसल्यामुळे पूजाच्या आईने तब्येत ठिक नसल्यामुळे तत्काळ तक्रार दिली नाही. तब्येत ठिक झाल्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. त्यानुसार मृत पूजाचा चुलत दीर अभिषेक देसाई याच्याविरूद्ध पूजा हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Harassment for relationship leads to suicide; cousin booked.

Web Summary : A married woman in Sangli committed suicide due to harassment and threats from her cousin-in-law, Abhishek Desai, who wanted a relationship with her. He has been booked for abetment.