चिमुकल्यांच्या वस्तू बाजारात हजारोंची उलाढाल
By Admin | Updated: December 2, 2014 00:18 IST2014-12-01T23:29:16+5:302014-12-02T00:18:01+5:30
नेर्ले येथील उपक्रम : पालक, ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

चिमुकल्यांच्या वस्तू बाजारात हजारोंची उलाढाल
नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित लहान मुलांनी भरविलेल्या वस्तू विक्रीच्या बाजारास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
लहान मुलांनी विक्रीस आणलेल्या वस्तूंची विक्रमी विक्री झाली. हजारो रुपयांची उलाढाल यामध्ये झाली. पालेभाज्या, कडधान्ये, पेये, जाम, पाणीपुरी, वडापाव, मिसळ, केरसुणी, चपला, पाण्याच्या बाटल्या, गुलाबजाम, पॅटीस, चिरमुरे, चने— फुटाणे, चिंच, भडंग, मातीच्या बैलजोड्या, इडली, जिलेबी, झाडू, लोणची, पापड, स्टेशनरी साहित्य आदी विविध वस्तू विद्यार्थ्यांनी बाजारात विक्रीस आणल्या होत्या. काही लहान मुले बाजारामध्ये फिरुन वस्तूंची विक्री करत होते. पालक, ग्रामस्थ, महिला यांनी उत्स्फूर्तपणे वस्तूंची खरेदी केली.
या बाजारास जनार्दन पाटील, सुभाष पाटील, संजय पाटील, वसंतराव पाटील, सुभाष पाटील, रवींद्र पाटील, सतीश पाटील, सम्राट महाडिक, रणधीर नाईक, राहुल पाटील, ए. आर. पाटील, एल. एम. पाटील, तुकाराम पाटील, अॅड. जालिंदर पाटील, उपसरपंच मीना माने, शारदामाई पाटील, जयकर पाटील, शिवाजी माळी, हेमंत पाटील, डॉ. एस. व्ही. पाटील, चंद्रकांत पाटील, महेश पाटील आदींनी भेट दिली.
यावेळी अपघात विम्यांतर्गत घबकवाडीच्या संगीता माणिक घबक यांना ५ लाखांचा धनादेश एम. डी. चोथे, मानसिंग पाटील, जे. जे. पाटील, सतीश पाटील यांच्याहस्ते देण्यात आला. नेर्ले बँक शाखेचे अशोक पाटील, जे. एल. जी. प्रमुख अशोक माने, आशिष कुंभार, शामराव चव्हाण, विकास महाडिक, प्रकाश जाधव, परसू देसाई, शंकर माने, साहेबराव बल्लाळ, लहू बल्लाळ यांनी संयोजन केले.
जयंत पाटील सह. दूध संस्थेच्यावतीने सर्वोत्कृष्ट १0 स्टॉलना चषक देण्यात आले, तर सहभागी मुलांना अदिती उद्योग समूहाच्यावतीने टोप्या देण्यात आल्या. धनंजय बामणे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. विजय लोहार यांनी आभार मानले. (वार्ताहर)