आजीच्या पुण्यतिथीनिमित्त आरोग्य केंद्रास हजार सिरिंज भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:20 IST2021-05-31T04:20:00+5:302021-05-31T04:20:00+5:30

कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथील सोनाबाई गणपती पाटील (आक्का) यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्ताने त्यांचे नातू दौलत पाटील ...

Thousands of syringes donated to the health center on the occasion of grandmother's death anniversary | आजीच्या पुण्यतिथीनिमित्त आरोग्य केंद्रास हजार सिरिंज भेट

आजीच्या पुण्यतिथीनिमित्त आरोग्य केंद्रास हजार सिरिंज भेट

कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथील सोनाबाई गणपती पाटील (आक्का) यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्ताने त्यांचे नातू दौलत पाटील यांनी कामेरी आरोग्य केंद्रास कोविड लसीकरणासाठी लागणाऱ्या एक हजार सिरिंज वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन चिवटे यांच्याकडे दिल्या.

या वेळी कोरोना आपत्ती व्यवस्थापन समिती सदस्य शहाजी पाटील, बंडाकाका पाटील, ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटील, किरण नांगरे, माजी उपसरपंच तानाजी माने, संग्राम महादेव पाटील, डॉ. किरण माने, आरोग्य साहाय्यक व्ही.एस. कोरे, एम.बी. कोरे, आरोग्य साहाय्यिका आर.एम. माने, एस.एल. धनवडे, औषध निर्माण अधिकारी एस. पी. आमने, ए. ए. पाटील उपस्थित होते.

फोटो : ३००५२०२१-आयएसएलएम-कामेरी सिरिंज वाटप : कामेरी (ता. वाळवा) येथे आरोग्य केंद्रास आजीच्या पुण्यस्मरणानिमित्त दौलत पाटील यांनी हजार सिरिंज भेट दिल्या. या वेळी तानाजी माने, शहाजी पाटील, बंडाकाका पाटील, योगेश पाटील, किरण नांगरे, संग्राम पाटील, व्ही.एस. कोरे आदी उपस्थित होते.

Web Title: Thousands of syringes donated to the health center on the occasion of grandmother's death anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.