इस्लामपुरात विकास आघाडी झाली नाही तरी रिंगणात उतरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:26 IST2021-01-20T04:26:40+5:302021-01-20T04:26:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : आगामी नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीविरोधात विकास आघाडीची मोट बांधली गेली तर ठीक, अन्यथा महाडिक युवा ...

इस्लामपुरात विकास आघाडी झाली नाही तरी रिंगणात उतरणार
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : आगामी नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीविरोधात विकास आघाडीची मोट बांधली गेली तर ठीक, अन्यथा महाडिक युवा शक्तीच्या जोरावर रिंगणात उतरण्याचा निर्धार माजी नगरसेवक कपिल ओसवाल आणि त्यांचे बंधू नगरसेवक अमित ओसवाल यांनी केला आहे.
मागील निवडणुकीत तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीविरोधात विकास आघाडीची मोट बांधण्यात अखेरपर्यंत प्रयत्न करावे लागले. आघाडी होतानाच राष्ट्रवादीतून विकास आघाडीत आलेल्या निशिकांत पाटील यांचा प्रवेश महत्त्वाचा ठरला. या विकास आघाडीतून प्रभाग १२ मधून अमित ओसवाल यांनी बाजी मारली.
आगामी निवडणुकीत प्रभाग रचना बदलणार असून, आता ‘एक नगरसेवक एक प्रभाग’ असणार आहे. ओसवाल बंधूंनी स्वत:च्या प्रभागातील विविध प्रश्न मार्गी लावल्याचा दावा केला आहे. कोरोनामध्ये योगदान दिल्याचे ते सांगतात. सामान्यांना केलेली मदत, प्रभागातील रस्ते आणि अंतर्गत रस्त्यावरील पूर्ण झालेल्या भुयारी गटारी ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यांच्या पाठीशी महाडिक युवा शक्तीची ताकद आहे. आता या ताकतीवर ते प्रभाग १२ आणि प्रभाग ९ मधील मतदारांचा मेळावा घेऊन वैयक्तिक संपर्क साधणार आहेत. त्यांनी नगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
कोट
विकास आघाडीतील मतभेदामुळे शहरातील विकासकामांना गती आली नाही. त्यामुळे नाराज आहोत. आम्ही आमच्या परीने प्रभागात विकासकामे केली आहेत. मी स्वत: प्रभाग १२ मध्ये व बंधू अमित ओसवाल प्रभाग ९ मधून निवडणूक लढविणार आहोत आणि माझी पत्नी अनिताही निवडणुकीत उतरणार आहे.
- कपिल ओसवाल, माजी नगरसेवक, महाडिक युवा शक्ती
फोटो - १९०१२०२१-आयएसएलएम-कपिल ओसवाल, अमित ओसवाल जेपीजी (दोन सिंगल फोटो)
लोगो- नगरपालिका