शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीची गळचेपी करणाऱ्यांना झुकवावे, अदित्य ठाकरेंनी केलं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 11:29 IST

इस्लामपूर : मुघल व औरंगजेबाने वाकडी नजर केली, त्याला महाराष्ट्राने झुकवले आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यातील जनतेला अशीच भूमिका ...

इस्लामपूर : मुघल व औरंगजेबाने वाकडी नजर केली, त्याला महाराष्ट्राने झुकवले आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यातील जनतेला अशीच भूमिका घेत लोकशाहीची गळचेपी करणाऱ्यांना झुकविण्याचे काम करावे लागणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आघाडीतील सर्वांना सोबत घेत महाराष्ट्रासाठी लढणार आहेत. त्यासाठी जनतेने शिवसेनेला साथ द्यावी, असे आवाहन युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.इस्लामपूरजवळील वाघवाडी फाटा येथे शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांशी आदित्य ठाकरे यांनी बुधवारी संवाद साधला. यावेळी खासदार अनिल देसाई, संपर्कप्रमुख नितीन बाणुगडे-पाटील, अरुण दुधवडकर, माजी आमदार उल्हास पाटील, सांगली जिल्हाप्रमुख अभिजित पाटील, संजय विभुते, उपजिल्हाप्रमुख शकील सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती.ठाकरे म्हणाले, राज्यातील मिंधे-भाजप सरकार हे घटनाबाह्य असून ते गद्दारांचे, पक्ष फोडणारांचे, चोरांचे आहे. हे सरकार मी मानत नाही. ती राजवट आहे. या सरकारच्या काळात जातीय दंगलीमध्ये वाढ झाली आहे. जाती-जातीत भांडणे लावून तेढ निर्माण केली जात आहे. या राजवटीकडून घाणेरडे राजकारण सुरू आहे. ते बदलायचे आहे. उद्धव ठाकरे सरकारच्या काळात एकही जातीय दंगल झाली नाही. राज्य पुढे जात होते. यांच्या काळात मात्र राज्य पिछाडीवर गेले आहे.

टॅग्स :SangliसांगलीShiv SenaशिवसेनाAditya Thackreyआदित्य ठाकरे