जिल्हा परिषदेतील २५० कर्मचाऱ्यांचे पगार थांबल

By Admin | Updated: February 25, 2015 00:02 IST2015-02-24T23:01:53+5:302015-02-25T00:02:51+5:30

संघटनाही गप्प : पदे मंजुरीचा आदेश नसल्याचा फटको

Thirty two employees of Zilla Parishad's salary | जिल्हा परिषदेतील २५० कर्मचाऱ्यांचे पगार थांबल

जिल्हा परिषदेतील २५० कर्मचाऱ्यांचे पगार थांबल

सांगली : राज्य शासनाने सर्व कर्मचाऱ्यांचे पगार आॅनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यानुसार प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षकांचे पगार आॅनलाईन होत आहेत़ परंतु, जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या पदाचा ताळमेळ जुळत नाही़ त्यामुळे २५० कर्मचाऱ्यांचे पगार जानेवारीपासून थांबले असून, कर्मचारी संघटनांचेही त्याकडे दुर्लक्ष असल्याने कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत़
आॅनलाईनमुळे पगार वेळेत होतील, अशा अपेक्षेत कर्मचारी होते़ परंतु, याच कर्मचाऱ्यांना आॅनलाईन प्रणालीतील त्रुटींचा फटका बसत आहे़ जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची किती पदे मंजूर आहेत़, कोणत्या आदेशामुळे त्या पदांना मंजुरी मिळाली आहे़, या सर्व प्रकारची माहिती जुळत नाही़ यामुळे जिल्हा परिषदेतील २५० कर्मचाऱ्यांचे पगार जानेवारी २०१५ पासून थांबले आहेत़ पदे मंजुरीच्या आदेशाबद्दल राज्य शासनाकडे पाठपुरावा करूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे, कर्मचाऱ्यांना फेबु्रवारीचा तरी पगार मिळेल का? याबद्दल खात्रीशीर माहिती सांगता येत नाही़ पुढे मार्च एन्डची लगबग सुरू झाल्यास एप्रिल, मेपर्यंत पगार लांबण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे़ त्यामुळे जिल्हा परिषदेतील २५० कर्मचारी चिंतेत आहेत़ दरम्यान, जि़ प़ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराबद्दल शासनाकडे बोट दाखवत असल्याचे दिसत आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Thirty two employees of Zilla Parishad's salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.