विवाहिता छळ प्रकरणी पतीस वर्षाची कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:30 IST2021-01-08T05:30:15+5:302021-01-08T05:30:15+5:30

विटा : टेम्पो व्यवसायासाठी माहेरून एक लाख रुपये घेऊन ये असे म्हणून चारित्र्याचा संशय घेत सतत घटस्फोटाची मागणी करीत ...

Thirty-five years in prison for marital abuse | विवाहिता छळ प्रकरणी पतीस वर्षाची कैद

विवाहिता छळ प्रकरणी पतीस वर्षाची कैद

विटा : टेम्पो व्यवसायासाठी माहेरून एक लाख रुपये घेऊन ये असे म्हणून चारित्र्याचा संशय घेत सतत घटस्फोटाची मागणी करीत जाधववाडी (ता. खानापूर) येथील विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी विटा न्यायालयाचे न्या. गौरव हंगे यांनी विवाहितेचा पती स्वप्नील शंकर कदम (३०, रा. जाधववाडी) यास एक वर्षाची साधी कैद व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. यावेळी सासरा शंकर बाळू कदम (६२) व सासू मालन शंकर कदम यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

जाधववाडी येथील पती स्वप्नील याने विवाहितेला माहेरून टेम्पो खरेदीसाठी पैसे आण. तू मला घटस्फोट दे म्हणून तिचा चारित्र्याचा संशय घेऊन मानसिक व शारीरिक छळ केला जात होता. त्यामुळे विवाहितेने २०१६ ला विटा पोलिसांत पती स्वप्नील, सासू मालन व सासरा शंकर बाळू कदम यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी न्या. हंगे यांच्यासमोर झाली. त्यावेळी न्यायालयाने पती स्वप्नील यास याप्रकरणी दोषी ठरवून वर्षाची साधी कैद व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावणी. दंडातील चार हजार रुपये विवाहितेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला. दंड न भरल्यास आणखी एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली. या खटल्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अमोल शिंदे यांनी केला होता. सरकार पक्षाच्यावतीने अ‍ॅड. मनोज भांदुर्गे यांनी काम पाहिले. त्यांना पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहन वाघमोडे यांनी मदत केली.

Web Title: Thirty-five years in prison for marital abuse