तेरा वर्षांच्या निरागस ‘जान्हवीला’ मदतीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:29 IST2021-03-01T04:29:40+5:302021-03-01T04:29:40+5:30

विकास शहा लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : कोकरूड (ता. शिराळा) येथील जान्हवी संजय घोडे खेळण्या बागडण्याच्या वयात रक्त दोषाच्या ...

Thirteen year old innocent ‘Janhvi’ needs help | तेरा वर्षांच्या निरागस ‘जान्हवीला’ मदतीची गरज

तेरा वर्षांच्या निरागस ‘जान्हवीला’ मदतीची गरज

विकास शहा

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : कोकरूड (ता. शिराळा) येथील जान्हवी संजय घोडे खेळण्या बागडण्याच्या वयात रक्त दोषाच्या निगडित थॅलेसिमीयी मेजर या आजाराने त्रस्त आहे. प्रत्येक महिन्याला तिचे रक्त बदलावे लागत आहे. पुढील उपचारासाठी ३५ लाख खर्च अपेक्षित आहे. यासाठी तिला समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीची गरज आहे.

जान्हवी इयत्ता ७ च्या वर्गात शिक्षण घेत आहे. घरी आई, वडील व लहान भाऊ आहे. जान्हवीचे वडील संजय घोडे हे शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांना वडिलाेर्जित पंधरा गुंठे शेतजमीन आहे. त्यावरच त्यांचा व कुटुंबाचा गाडा चालतो. जान्हवीच्या दवाखन्यामुळे खर्च वाढतच आहे. यामुळे खर्च काही केल्याने भागत नाही. म्हणून बँकेचे कर्ज काढून तसेच पै पै जमा करून पोटच्या गोळ्याचा दवाखना सुरू ठेवला आहे.

मुंबई येथील चिल्ड्रन हाॅस्पिटलमधील डाॅक्टरांनी बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही वैद्यकीय प्रक्रिया त्वरित करणे गरजेचे असल्याचे सांगितले असून, त्यासाठी एकूण ३५ लाख ५० हजारांचा खर्च अपेक्षित आहे. तो करणे तिच्या कुटुंबाच्या हाताबाहेर आहे. गत तेरा वर्षे तिचे रक्त बदलून कसबसे उपचार सुरू आहेत. याचा संपूर्ण आर्थिक ताण कुटुंबावरच पडत असल्याने जगणे मुश्कील झाले आहे.

आता समाजातील दानशूर व्यक्तींनी जान्हवीच्या वैद्यकीय खर्चासाठी मदतीचा हात देणे गरजेचे असून जान्हवीच्या आई- वडिलांची केविलवाणी धडपड जाणून घेणे गरजेचे आहे.

Web Title: Thirteen year old innocent ‘Janhvi’ needs help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.