कोल्हापूरमध्ये १० महिन्यांनंतर नाटकाची तिसरी धंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:27 IST2021-01-20T04:27:28+5:302021-01-20T04:27:28+5:30
काेरोना काळात नाट्य व्यवसाय खूप अडचणीत आला होता. बॅकस्टेज कलाकार, तंत्रज्ञ, साऊन्ड ऑपरेटर यांचे खूपच हाल झाले. काही लाेक ...

कोल्हापूरमध्ये १० महिन्यांनंतर नाटकाची तिसरी धंटा
काेरोना काळात नाट्य व्यवसाय खूप अडचणीत आला होता. बॅकस्टेज कलाकार, तंत्रज्ञ, साऊन्ड ऑपरेटर यांचे खूपच हाल झाले. काही लाेक या नाट्य व्यवसायातून बाहेर पडले; पण आता नाट्यक्षेत्र हळूहळू पूर्वपदावर येताना दिसत आहे. कोल्हापूरमध्ये जास्तीत जास्त नाट्यप्रयोग व्हावेत, यासाठी महानगरपालिकेने नाट्यगृह भाड्यात ५० टक्के सवलत दिली. सरकारने नाट्यगृहात नाटक सादर करण्यासाठी काही अटी व नियम घातले आहेत. त्यामध्ये ५० टक्के आसन क्षमता, मास्क आवश्यक, सोशल डिस्टसिंग या बाबी आहेत. या सर्व नियमांचे काटेकोर पालन होणार आहे.
कोल्हापूरकर असलेल्या भरत जाधव यांच्या नाटकाने काेल्हापुरात पुन्हा नाटकांना सुरुवात होतेय, ही कोल्हापूरसाठी अभिमानाची बाब आहे. पहिल्या नाटकासाठी कोकण व पश्चिम महाराष्ट्र नाट्यवितरक संघाचे अध्यक्ष विकास पावसकर हेही उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संयोजक वैभव एंटरप्रायजेसचे संजय लोंढे व गायकवाड पब्लिसिटीचे
मारूती गायकवाड यांनी दिली.
फाेटाे : १९०१२०२१ एडीव्हीटी १