जिल्ह्याच्या सीमेवरील रस्त्यांवर चोरांची दहशत

By Admin | Updated: February 9, 2015 01:12 IST2015-02-09T01:09:01+5:302015-02-09T01:12:07+5:30

वाटमारीची भीती : सोलापूर, सांगली, सातारा पोलिसांत समन्वयाची गरज

Thieves in the streets on the boundary of the district panic | जिल्ह्याच्या सीमेवरील रस्त्यांवर चोरांची दहशत

जिल्ह्याच्या सीमेवरील रस्त्यांवर चोरांची दहशत

पणजी : विज्ञान संमेलन आणि प्रदर्शन यातून युवकांना प्रेरणा तर मिळणारच आहे. मात्र, कारागिरांना किंवा नवे संशोधन, तंत्रांची निर्मिती करू इच्छिणाऱ्यांना हा एक पाया ठरू शकतो. त्यामुळे युवकांनी त्याचा उपयोग करून तंत्रज्ञानात क्रांती घडवावी, असा सूर मान्यवरांनी समारोपप्रसंगी व्यक्त केला.
कांपाल येथे भरलेल्या ‘भारतीय विज्ञान संमेलन आणि एक्स्पो’ चा रविवारी समारोप झाला. या वेळी कोळसा आणि अक्षय ऊर्जा केंद्रीय राज्यमंत्री पियुष गोयल, पद्मविभूषण डॉ. एम. एस. वालिथन, डॉ. प्रमोद वर्मा, गोवा विद्यापीठाचे कुलगुरू सतीश शेटये, प्रा. डॉ. हरिलाल मेनन, एन. आय. ओ.चे संचालक डॉ. एस. डब्ल्यू. ए. नक्वी, गोवा विज्ञान-तंत्रज्ञान आणि पर्यावरण खात्याचे संचालक डॉ. हरिलाल मेनन आणि
डॉ. जयंत सहस्त्रबुद्धे यांची या वेळी उपस्थिती होती.
केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले की, भारतीय विज्ञान प्रदर्शन मुलांना उत्तेजना देणारे ठरेल, असे सांगून आयोजकांचे त्यांनी कौतुक केले.
डॉ. मेनन यांनी युवकांना विज्ञान आणि तंज्ञत्रानविषयी या प्रदर्शनातील प्रत्येक कार्यक्रम पूरक माहिती देणारा ठरला आहे. कुलगुरू डॉ. शेट्ये यांनी गोवा विद्यापीठाने हे विज्ञान प्रदर्शन गोव्यात खेचून आणले. त्यामुळे त्यातील अनुभवातून विद्यार्थ्यांना बरेच काही शिकता येणार आहे.
मार्टिन म्हणाले की, या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना देशाच्या संरक्षण तंत्रज्ञानातील माहिती उपलब्ध झाली. डॉ. प्रमोद वर्मा म्हणाले, की सामान्य माणसाचा विकसित तंत्रज्ञानामुळे काय फायदा झाला आहे, हे या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना समजावून घेता आले. डीआरडीओ (डिफेन्स रिसर्च डेव्हल्पमेंट आॅर्गनायझेशन)मुळे युवकांना अशा प्रदर्शनातून नव्या संकल्पना आणि उत्पादन निर्मितीसाठी उत्तेजना मिळू शकते.
डॉ. वालिथन म्हणाले की, अशा प्रदर्शनातून नव्या संकल्पनांना चालना मिळू शकते. भारतीय विज्ञान संमेलनामुळे मिळालेले हे ज्ञान कायमस्वरूपी स्मृतीत ठेवता
येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Thieves in the streets on the boundary of the district panic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.