जतला मोटारीतून चोरट्यांनी पावणेचार लाख लांबवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:29 IST2021-09-21T04:29:58+5:302021-09-21T04:29:58+5:30
संभाजी चौगुले यांचे द्राक्षबाग व डाळिंब बाग असून, बागेतील मालाचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा झाले होते. उमराणी रोडवरील बँकेतून ...

जतला मोटारीतून चोरट्यांनी पावणेचार लाख लांबवले
संभाजी चौगुले यांचे द्राक्षबाग व डाळिंब बाग असून, बागेतील मालाचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा झाले होते. उमराणी रोडवरील बँकेतून पैसे काढून झाल्यानंतर मोटारीत हवा कमी झाल्याचे दिसताच ते हवा भरण्यासाठी थांबले. त्याचवेळी पांढरा शर्ट घातलेल्या व तोंडाला मास्क घातलेल्या चोरट्याने पाठीमागील डिकी खोलून आत प्रवेश केला. मोटारीच्या मागील सीटवर ठेवलेल्या पिशवीतील रोख रक्कम ३ लाख ७० हजार रुपये घेऊन पळत जात असताना तो दिसला. त्याचा पाठलाग करीत असता पाठीमागून दुसरा दुचाकीस्वार साथीदार येऊन त्याला घेऊन गेला. त्यामुळे त्यांचा पाठलाग करता आला नाही. चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असली तरी, अंधुक व धूसर दिसत असल्याने संशयितांची ओळख पटली नाही. याबाबत जत पोलीस ठाण्यात चौगुले यांनी फिर्याद दिली आहे.