रेल्वेतील सफाई कामगारांनी चोर पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:15 IST2021-02-20T05:15:53+5:302021-02-20T05:15:53+5:30

गुरुवारी सकाळी पुणे ते कोल्हापूरकडे जाणाऱ्या महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये चोरीबाबत संबंधित प्रवाशाने रेल्वेतील सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्याकडे तक्रार केली. ...

The thief was caught by railway cleaners | रेल्वेतील सफाई कामगारांनी चोर पकडला

रेल्वेतील सफाई कामगारांनी चोर पकडला

गुरुवारी सकाळी पुणे ते कोल्हापूरकडे जाणाऱ्या महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये चोरीबाबत संबंधित प्रवाशाने रेल्वेतील सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्याकडे तक्रार केली. दरम्यान, रेल्वे सफाई कर्मचारी ऋषिकेश शिंदे व योगेश काशीद यांनी एका संशयित प्रवाशाच्या संशयास्पद हालचालीबाबत रेल्वे सुरक्षा दलास माहिती दिली.

या संशयित प्रवाशाच्या साहित्याची तपासणी केल्यावर त्याच्याकडे चोरीचा मुद्देमाल आढळला. चोरीला गेलेले आठ हजार रुपये, आठ ग्रॅम सोन्याचे दागिने, चार पिशव्या, एक पर्स जप्त करण्यात आली. संशयित प्रवाशाने सामान चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यास रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती रेणू शर्मा व मुख्य यांत्रिकी अभियंता ए.के. गुप्ता यांनी ऋषिकेश शिंदे व योगेश काशिद यांच्या सतर्कतेचे कौतुक केले.

Web Title: The thief was caught by railway cleaners