शिराळ्यात चोरीप्रकरणी चोरट्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:28 IST2020-12-06T04:28:11+5:302020-12-06T04:28:11+5:30

शिराळा : येथील सोमवार पेठेमधील सरस्वती नर्सिंग होममधील झालेल्या चोरीप्रकरणी रोहित बाजीराव आखळे (वय ३०, रा. केदारवाडी, सध्या ...

Thief arrested in Shirala theft case | शिराळ्यात चोरीप्रकरणी चोरट्यास अटक

शिराळ्यात चोरीप्रकरणी चोरट्यास अटक

शिराळा : येथील सोमवार पेठेमधील सरस्वती नर्सिंग होममधील झालेल्या चोरीप्रकरणी रोहित बाजीराव आखळे (वय ३०, रा. केदारवाडी, सध्या रा. कामेरी, ता. वाळवा) यास शिराळा पोलिसांनी अटक केली आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता, सोमवार, दि. ७ अखेर पोलीस कोठडीचे आदेश दिला.

काही दिवसांपूर्वी डॉ. जयदीप शरद नलवडे यांच्या सरस्वती नर्सिंग होम येथे टेबलच्या ड्रॉवरमधून अज्ञाताने १० हजार रुपये चोरी केले होते. या प्रकरणाचा तपास करत असताना सोमवार पेठ येथे संशयित रोहित आखळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चाैकशी केली असता, त्याने चोरीची कबुली दिली. सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कालिदास गावडे, नितीन यादव, नागनाथ पवार, संदीप पाटील, विनोद जाधव, रणजित टोमके, तुषार जाधव यांनी कारवाई केली. शिराळा पोलिसांनी सलग चौथा गुन्हा उघडकीस आणून संशयितांना अटक केली आहे.

Web Title: Thief arrested in Shirala theft case