सांगलीत चोरट्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:29 IST2021-01-08T05:29:26+5:302021-01-08T05:29:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : दुचाकीला लावलेली पैशाची पिशवी लंपास करणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. ...

सांगलीत चोरट्याला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : दुचाकीला लावलेली पैशाची पिशवी लंपास करणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. राजू पवित्रा कांबळे (वय ३६, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, सांगली) असे संशयिताचे नाव आहे. तो रेकाॅर्डवरील गुन्हेगार आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप कदम कर्मचाऱ्यांसह शंभरफुटी रस्त्यावर पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी त्रिमूर्ती काॅलनीच्या रिक्षा थांब्याजवळ राजू कांबळे पैशाचे बंडल घेऊन फिरत असल्याची माहिती खबऱ्यांनी दिली. एलसीबीच्या पथकाने तिकडे धाव घेतली असता, रिक्षा थांब्याजवळ राजू कांबळे आढळला. त्याची झडती घेतली असता दहा हजार रुपये रोख व मोबाईल असा मुद्देमाल त्याच्याकडे मिळाला. त्याच्याकडे पैशाबाबत विचारणा केली असता, महिन्यापूर्वी त्रिमूर्ती चौकातील चहा दुकानासमोर एका दुचाकीला पिशवी अडकविली होती. ती पिशवी त्याने लंपास केली होती, त्यात पैसे होते, असे त्याने सांगितले. त्याला ताब्यात घेऊन विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
राजू कांबळे हा रेकाॅर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर संजयनगर, विश्रामबाग, मिरज शहर, महात्मा गांधी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक कदम, अरुण औताडे, नीलेश कदम, मेघराज रूपनर, संदीप पाटील, वैभव पाटील, प्रशांत माळी यांच्या पथकाने केली.