शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

गु-हाळांच्या चिमण्या थंडच : उसाचेही संकट; गुळाचे उत्पादन घटण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 11:45 PM

सांगलीत कर्नाटकातील रायबाग, अथणी, चिक्कोडी, सौंदत्ती, जमखंडी, हारुगेरी, महालिंगपूर, हिडकल येथून गूळ येतो. यंदा महापुराने तेथील गुºहाळघरे पाण्याखाली गेली, ऊसही बुडाला होता. शिराळा तालुक्यातही अशीच स्थिती होती. तेथील हंगाम तुळशी पौर्र्णिमेनंतर सुरु होतो. यंदा तो सुरू होण्याची चिन्हे अजूनही नाहीत.

ठळक मुद्दे महापुराचा फटका

संतोष भिसे ।सांगली : महापुराने गुºहाळेही मोडकळीस आली आहेत. दिवाळी संपली तरी गळीत हंगामाची चिन्हे नाहीत. सांगलीला गूळ पाठविणारी कर्नाटकातील गुºहाळेही संकटात आहेत. महापुराने ऊस उद्ध्वस्त झाल्याचा फटका गुºहाळांनाही बसला आहे. त्यामुुळे यंदा गुळाची भाववाढ होण्याची शक्यता आहे.

सांगलीत कर्नाटकातील रायबाग, अथणी, चिक्कोडी, सौंदत्ती, जमखंडी, हारुगेरी, महालिंगपूर, हिडकल येथून गूळ येतो. यंदा महापुराने तेथील गुºहाळघरे पाण्याखाली गेली, ऊसही बुडाला होता. शिराळा तालुक्यातही अशीच स्थिती होती. तेथील हंगाम तुळशी पौर्र्णिमेनंतर सुरु होतो. यंदा तो सुरू होण्याची चिन्हे अजूनही नाहीत. पुराने गुºहाळघरांची प्रचंड पडझड झाली. कर्नाटकात हजारो एकर ऊस पाण्याखाली गेला. गेल्या आठवड्यापर्यंत पाऊस सुरू असल्याने गळीत सुरु झाले नाही. रानात चिखल आणि पाणी साचून असल्याने तोडी ठप्प आहेत. या संकटग्रस्त स्थितीत गळीत कसे सुरु करायचे, हा प्रश्न गुºहाळमालकांपुढे आहे. जुलैपासून सांगली बाजार समितीत गुळाची आवक घटली आहे, त्यामुळे दर देखील तेजीत आहेत.गुळाची आवक (क्विंटल)जुलै - रवे - २६ हजार ८०३, भेली - ५२ हजार ९३२. आॅगस्ट - ३० हजार ५१६, भेली - ४३ हजार ९०१. सप्टेंबर - २९ हजार ८४३, भेली- ४१ हजार ८३६. आॅक्टोबर - २६ हजार ६४३, भेली - ३९ हजार २७६.आॅक्टोबरमध्ये : दरात घसरणजूनमध्ये गुळाला ३ हजार ७०८ रुपये क्विंटलला भाव मिळाला होता. जुलैमध्ये ३ हजार ६७२, आॅगस्टमध्ये ४ हजार २५४ व सप्टेंबरमध्ये ४ हजार १० रुपये भाव मिळाला. आॅक्टोबरमध्ये आवक घटल्याने भाव ४,२०० रुपयांपर्यंत गेले.यंदा गुळासाठी पुरेसा ऊस उपलब्ध होईल याचा भरवसा नाही. त्याचा परिणाम आवकेवर होऊ शकतो. चार महिन्यात चांगला दर मिळाला. कर्नाटकात उसाच्या नुकसानीने उत्पादन घटू शकते.- जे. के. पाटील, सहायक सचिव, बाजार समिती, सांगलीशिराळ्यात अवघी सात-आठ गुºहाळे उरली आहेत. महापुरात मांडवात पाणी भरले, जळण भिजले. ऊसही पाण्यातच आहे. हंगाम अद्याप सुरू नाही. काटा पेमेन्ट देऊनही उसाचा भरवसा नाही. शासनाने उद्योगाला हात द्यावा. - जालिंदर शेळके , गुºहाळचालक, पुनवत (ता. शिराळा) 

टॅग्स :Sangliसांगलीfloodपूर