सांगलीत ढगांची दाटी, तुरळक पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:27 IST2021-05-19T04:27:08+5:302021-05-19T04:27:08+5:30
सांगली : शहर व परिसरात मंगळवारी पुन्हा ढगांची दाटी झाली. शहर व परिसरात काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. दरम्यान, ...

सांगलीत ढगांची दाटी, तुरळक पाऊस
सांगली : शहर व परिसरात मंगळवारी पुन्हा ढगांची दाटी झाली. शहर व परिसरात काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. दरम्यान, घटलेल्या कमाल तापमानात चार अंशाने वाढ झाली.
सांगली शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळी चारनंतर ढगांची दाटी वाढली. काही ठिकाणी केवळ पावसाचा शिडकावा झाला. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार बुधवारीही ढगाळ वातावरण व काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज आहे. २० मेपासून ढगांची दाटी हटणार आहे. २१ मेपासून आकाश निरभ्र होण्याची चिन्हे आहेत.
सोमवारी कमाल तापमानात कमालीची घट झाली होती. मंगळवारी पुन्हा त्यात चार अंश वाढ होऊन पारा ३१ अंशावर आला आहे. तरीही उकाडा नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. किमान तापमान अद्याप २४ अंश सेल्सिअसवर कायम आहे. २४ मेपर्यंत किमान तापमानात एक अंशाने घट तर कमाल तापमानात अंशाने वाढ होणार आहे.