भाटवाडी ग्रामपंचायतीत होणार दुरंगी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:26 IST2021-01-08T05:26:50+5:302021-01-08T05:26:50+5:30

इस्लामपूर : भाटवाडी (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायतीच्या ९ जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात राहिले. त्यामुळे याठिकाणी दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट ...

There will be a two-way fight in Bhatwadi Gram Panchayat | भाटवाडी ग्रामपंचायतीत होणार दुरंगी लढत

भाटवाडी ग्रामपंचायतीत होणार दुरंगी लढत

इस्लामपूर : भाटवाडी (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायतीच्या ९ जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात राहिले. त्यामुळे याठिकाणी दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले. अर्ज माघारीच्यादिवशी २० उमेदवारांनी माघार घेतली. या ग्रामपंचायतीवर जलसंपदा मंत्री जयंत पाटील व माजी मंत्री भाजपचे शिवाजीराव नाईक यांच्या संयुक्त गटाची सध्या सत्ता आहे. या गटाविरोधात माजी उपसरपंच शिवाजी उथळे आणि भाजप नेते सम्राट महाडिक यांचे समर्थक राहुल मोरे यांचा गट लढत देत आहे. भाटवाडी ग्रामपंचायतीमध्ये तीन प्रभागांत ९ जागा आहेत. प्रभाग १ मधून कल्पना केसरे, स्वाती केसरे, दीपाली उथळे, लीलाबाई देवकर, सचिन डोंगरे, विक्रम सावंत हे उमेदवार आहेत. प्रभाग क्र. २ मधून नेताजी चव्हाण, सूर्यकांत बल्लाळ, काशिलिंग तिवले, शहाजी तिवले, माधुरी उथळे, सुनीता लाहिगडे हे उमेदवार लढतील. प्रभाग क्र. ३ मध्ये शारदा माने, हेमा तिवले, कमल उथळे, अलकाताई पवार, सुहास साळुंखे, अमोल देवकर यांच्यामध्ये लढत होईल.

Web Title: There will be a two-way fight in Bhatwadi Gram Panchayat