शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
2
हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना
3
Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले
4
७ कोटी मुलांसाठी गुड न्यूज; आता शाळेतच होणार आधारशी निगडीत 'हे' काम, UIDAI ची विशेष सुविधा
5
कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली? डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर
6
इस्रायल थांबला, पण आता तुर्की सुरू झाला... सिरियामध्ये हाहा:कार, दमास्कसनंतर अलेप्पो 'लक्ष्य'
7
सत्तेची मस्ती, नेत्यांची फ्री स्टाईल कुस्ती! महायुतीतील तिन्ही पक्षांनी जनतेला दाखवला 'लाथा-बुक्क्यांचा सिनेमा'
8
"कृषिमंत्री कोकाटेंचा खुलासा अयोग्यच, एक-दोन वेळा दादांनीही...!"; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
9
ज्यूस प्यायला नाही म्हणून सांबारमध्ये विष; २ मुलांच्या आईला बॉयफ्रेंडने दिली भयंकर आयडिया अन्...
10
"अजून मारा पण कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या"; मारहाणीनंतर विजयकुमार घाडगे संतप्त; म्हणाले, 'तटकरेंना एक शब्द वाकडा बोललो असेल तर...'
11
IND vs ENG : टीम इंडियातील हा स्टार खेळाडू मालिकेतून 'आउट'; चौथ्या कसोटी आधी आली संघ बदलण्याची वेळ
12
मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला! विमान धावपट्टीवरून घसरले, तिन्ही टायर फुटल्याने खळबळ
13
“माझा हक्क आहे, पण विरोधी पक्षनेता असूनही संसेदत बोलू दिले जात नाही”; राहुल गांधींचा आरोप
14
७/११तील सर्व दोषी निर्दोष, भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले, “CM फडणवीसांना...”
15
"स्मिता तळवलकर नाराज झाल्या आणि मी...", 'लक्ष्मी निवास' फेम तुषार दळवींनी सांगितला 'तो' किस्सा
16
चीनने ब्रह्मपुत्रा नदीवर सर्वात मोठे धरण बांधण्यास सुरुवात केली; भारताने आधीच घेतला आक्षेप
17
Nashik: 'आई, तुला त्रास द्यायचा नाही, तू...'; पोलीस महिलेच्या लेकीने आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमध्ये काय?
18
भज्जीनं मारलेली ती 'थप्पड' श्रीसंतच्या लेकीच्या मनाला लागलीये! फिरकीपटूनं शेअर केली त्यामागची स्टोरी
19
झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार
20
Tripti Sahu : "TV स्टार्स गोरं होण्यासाठी घेतात इंजेक्शन", पंचायत फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

सांगलीत काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर; दोन गट नाराज, पक्षीय कार्यापासून दूर

By अविनाश कोळी | Updated: February 17, 2025 17:06 IST

लोकसभेला बांधकाम, विधानसभेला पडझड

अविनाश कोळीसांगली : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला लागलेले बंडखोरीचे खंडग्रास ग्रहण आता फुटीच्या खग्रास ग्रहणाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात मोठी ताकद असलेले दोन्ही गट सध्या पक्षीय कार्यापासून दूर वेगळ्या वाटेने जाण्याच्या विचारात दिसत आहेत. पक्षीय स्तरावर याबाबत कोणतीही पावले न उचलल्यास मोठा फटका जिल्ह्यातील काँग्रेसला बसणार आहे.सांगली विधानसभा निवडणुकीतील बंडखोरी राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली होती. ही बंडखोरी रोखण्यात ना स्थानिक नेत्यांना यश आले ना राज्यस्तरावरील नेत्यांना. निवडणुकीत या बंडखोरीचा फटका पक्षाला बसला. त्यानंतर मतदारसंघातील काँग्रेसचे राजकारण थंडावले.जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष व निवडणुकीतील अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्यात अत्यंत टोकाचे आरोप-प्रत्यारोप झाले. सोशल मीडियावरील पोस्टवरून पोलिसांत तक्रारी व गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे लोकसभेला एकसंध असणारे हे दोन्ही गट टोकाच्या संघर्षाने विभागले गेले. राजकारण केवळ गटबाजीपुरते उरले नाही, तर पक्षफुटीपर्यंत टोकाला गेले अहे.

वादळापूर्वीची शांतताजयश्रीताई पाटील यांनी पुढील राजकीय वाटचालीचा निर्णय अद्याप जाहीर केला नाही. मात्र, वेगळा विचार करण्याचे संकेत त्यांनी यापूर्वीच दिले आहेत. त्यांच्या अन्य पक्षातील प्रवेशाच्या चर्चाही सुरू आहेत. सध्या जयश्रीताई पाटील व त्यांच्या विरोधातील पृथ्वीराज पाटील यांचा गट शांत असला तरी ही वादळापूर्वीची शांतता असल्याचे सांगितले जात आहे.

भाजप नेत्यांशी मैत्रभावपृथ्वीराज पाटील यांच्या भेटीला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आले होते. पाटील यांच्या निवासस्थानी त्यांचा पाहुणचार करण्यात आला. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ व पृथ्वीराज पाटील एकत्र आले होते. त्यांचा हा मैत्रभावही पक्षप्रवेशाच्या चर्चांना बळ देत आहे.

कार्यकर्ते संभ्रमावस्थेतसांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्र, तसेच सांगली व मिरज विधानसभा मतदारसंघात या दोन्ही गटांची ताकद आहे. त्यांना मानणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत. मात्र, दोन्ही नेत्यांच्या शांत भूमिकेमुळे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत.

लोकसभेला बांधकाम, विधानसभेला पडझडकाँग्रेसचे नेते व माजी मंत्री आमदार विश्वजीत कदम यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस एकसंध केली होती. बऱ्याच वर्षांनंतर एखाद्या काँग्रेस नेत्याला असे यश मिळाले होते. त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला झाला. मात्र, काँग्रेस एकजुटीच्या या गडाची पडझड लगेच विधानसभा निवडणुकीत झाली. आता पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीcongressकाँग्रेसPoliticsराजकारण